Chandrasekhar Bawankule: सरकारमध्ये फडणवीस का आवश्यक ? बावनकुळेंनी सांगितला भाजपचा प्लॅन

Why Devendra Fadnavis Necessary in Maharashtra Govt BJP Maharashtra Politics:पाच वर्षांसाठी आम्ही योजना तयार करीत आहोत, यासाठी सरकारमध्ये राहूनच फडणवीस यांनी संघटनेला मदत करावी, अशी विनंती आम्ही केली होती.
Devendra Fadnavis Necessary in Maharashtra Govt
Devendra Fadnavis Necessary in Maharashtra GovtSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: महायुतीचा मिशन 45 ला धुळीत मिळवत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात दमदार मुसंडी मारत महायुतीची दाणादाण उडवली.निकालाचं अपयशाची जबाबदारी उचलत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मला मोकळे करा, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. त्यांची मागणी पक्षश्रेष्ठींनी फेटाळली आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांना फडणवीस का हवे आहेत याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची महाराष्ट्रात अंमबलजावणी करायची आहे.फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशिवाय ती शक्य नाही. पुढील पाच वर्षांसाठी आम्ही योजना तयार करीत आहोत, यासाठी सरकारमध्ये राहूनच फडणवीस यांनी संघटनेला मदत करावी, अशी विनंती आम्ही केली होती. ती त्यांनी मान्य केली आहे.

दहा वर्षांपासून महाविकास आघाडीच्या नेते मोदी यांना शिव्या घालत आहेत. वैयक्तिक टीका करीत असतात. मात्र ते एक शब्द बोलले तर एवढा राग का येतो याचे आकलन शरद पवार यांनी केले पाहिजे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेण्याचा प्रकार महाराष्ट्राला अशोभनीय आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तो शोभा देत नाही. त्यांनी पदाचा अपमान केला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असाही सल्ला बावनकुळे यांनी दिला.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण राहणार याची आज चर्चा करण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नेते आहेत. भावी मुख्यमंत्री कोण हे तीनही पक्षाचे नेते ठरवतील. या जर तरच्या गोष्टीला सध्या काही महत्त्व नाही. ते निवडणुकीनंतर ठरले असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Devendra Fadnavis Necessary in Maharashtra Govt
Nana Patole: ...म्हणून मी पटोलेंचे पाय धुतले; काँग्रेस कार्यकर्त्यांने सांगितलं कारण, पाहा व्हिडिओ

लोकसभेत पराभव झाला असला तरी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी चांगले काम केले. महाराष्ट्रात आमचे उमेदवार जास्त पराभूत झाले. मात्र मतदानाचा टक्का फारसा घसरला नाही. फक्त शून्य पॉइंट तीन टक्के आमचा मतदानाचा टक्का कमी झाला आहे. तो भरून काढण्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. जिथे कमी पडलो तेथे अधिकचे काम केले जाईल, असे पटोले म्हणाले.

पटोले म्हणाले, "भाजपच्यावतीने राज्यभर धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे. ज्यांनी मते दिली आणि नाही दिली त्यांचेही आम्ही आभार मानणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावर आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये याची काळजी आम्ही सुरुवातीपासूनच घेत आहोत,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com