Chandrasekhar Bawankule : 'महायुतीचे जागावाटप ना स्ट्राईक रेटवर ना आकड्यांवर..' ; चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट!

Mahayuti and Vidhan Sabha Election : महाविकास आघाडीपूर्वी महायुतीच्या उमेदवारांच्या घोषणा होणार असल्याचेही बावनकुळेंनी सांगितले.
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Chandrasekhar Bawankule on Assembly Elections : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा वाटप करताना स्ट्राईक रेटचा आग्रह धरला आहे. या माध्यमातून त्यांना विधानसभेच्या जागा वाढवून घ्यायच्या आहेत. असे असले तरी महायुतीच्या सुमारे ८० टक्के जागांवर सर्वांचे एकमत असल्याचे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपावरून कुठलाचा वाद नसल्याचे स्पष्ट केले. आमचे जागा वाटपाचे धोरण आकड्यांवर नाही तर जिंकण्याच्या क्षमतेवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तीनही पक्षाचे नेते लवकरच पत्रकार परिषद घेऊन महायुतीचा फॉर्म्युला आणि कोणाला कुठल्या जागा हे जाहीर करणार असल्याचाही दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्यापूर्वी महायुतीच्या उमेदवारांच्या घोषणा होणार असल्याचे सांगितले.

सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावरून खल सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाचा स्ट्राईक रेट जागा वाटप करताना विचारात घ्यावा असे सुचवले आहे. असे झाल्यास सर्वाधिक जागा शिंदे सेनेच्या वाट्याला येऊ शकतात. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा यास विरोध होऊ शकतो.

Chandrasekhar Bawankule
Anandrao Adsul News : माजी खासदार आनंदराव अडसूळ आता करणार दर्यापूर विधानसभा मतदारसंघावर दावा?

ज्याची जिंकूण येण्याची क्षमता त्या पक्षाला उमेदवारी असे सूत्र सध्या महायुतीने ठरवले आहे. चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) म्हणाले, महायुतीतील तीनही पक्षाच्या नेत्यांनी आकड्यावर जायचे नाही असे ठरवले आहे. जिंकण्यासाठी लढायचे हा आमचा फॉर्म्युला आहे. यापेक्षा वेगळा कोणताही फॉर्म्युला नाही .

Chandrasekhar Bawankule
Raj Thackeray on Ajit Ranade : ''अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का ?''

जेथे अजित पवार(Ajit Pawar) जिंकण्याची शक्यता आहे तिथे त्यांचा आग्रह आम्ही मान्य करू. हेच धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी राहाणार आहे. भाजपची जिंकण्याची शक्यता आहे त्याठिकाणी तेथे आमचा आग्रह राहील आणि सर्वच त्यास मान्यता देतील, असाही विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com