Chandrashekhar Bavankule: बावनकुळेंची पहिल्या नंबरच्या खुर्चीकडे वाटचाल! जयंत पाटलांनी वाढवलं अनेकांचं टेन्शन

Chandrashekhar Bavankule: जयंत पाटील यांनी भाजपच्या वरच्या लोकांनी माझी सूचना व भाषण ऐकावे असे सांगून बावनकुळे यांचे राजकीय वजन आणखीच वाढवले.
Chandrashekhar Bavankule & Jayant Patil
Chandrashekhar Bavankule & Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

नागपूर ः चंद्रशेखर बावनकुळे धडाकेबाज मंत्री आहेत. महसुलासारखा क्लिष्ट विभाग सांभाळणे सोपे काम नाही. कोर्ट-कचेऱ्या करून लोक थकून जातात मात्र निर्णय होत नाहीत. पण बावनकुळे हे झपाट्याने अनेक निर्णय घेत आहेत. अडचणीच्या प्रक्रिया सोप्या करीत आहेत. अनेक कायदे बदलत आहे. मीसुद्धा त्यांचा प्रशंसक आहे. लोकांच्या मनातील निर्णय घेऊन ते आता नंबर वनच्या खुर्चीकडे वाटचाल करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल भाजपच्या वरिष्ठांनी घ्यावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी करून अनेकांचे टेन्शन वाढवले. यावेळी त्यांनी तुमच्या समोर फक्त दोन खुर्च्या आहेत, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही बिनधास्त नंबर वनच्या खुर्चीकडे जा असे सांगून पाटील यांनी बावनकुळे यांचे अभिनंदनही केले.

Chandrashekhar Bavankule & Jayant Patil
Shilpa Thokde: लेडी सिंगम तहसीलदार शिल्पा ठोकडेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव! आमदारांनी नेमक्या काय केल्यात तक्रारी?

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक आज विधानसभेत सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. या विधेयकाचे भाजपच नव्हे तर सर्वच पक्षाच्या आमदारांनी स्वागत केले. या विधेयकामुळे शहरातील नागरिकांवर पडणारा अकृषक कराचा बोझा संपणार आहे. इमारत किंवा लेआऊट पडल्यानंतर एकदाच अकृषक कर आकाराला जाणार आहे. त्यानंतर दरवर्षी अकृषक कर भरण्याची यापुढे गरज भासणार नाही. याशिवाय जमीन मोजणीची प्रक्रियासुद्धा सुलभ करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.

Chandrashekhar Bavankule & Jayant Patil
Sharad Pawar: वाढदिवसाचं निमित्त! अजित पवार, प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल; मविआचे नेतेही पोहोचले

पंधरा दिवसांच्या आता सर्व जमिनीची मोजणी व्हावी अशी यंत्रणा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकावर बोलताना जयंत पाटील यांनी बावनकुळे यांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. महसूल विभाग सांभाळणे अवघड आहे. वर्षानुवर्षे या खात्यात निर्णयच होत नाही. चकरा मारून लोक थकून जातात. कोर्टात गेल्यानंतर तीनतीन दशके निर्णय घ्यायला लागतात. मात्र बावनकुळे महसूलमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. अनेक जुने व क्लिष्ट नियम त्यांनी बदलवले. सर्व प्रक्रिया सोप्या केल्या. लोकांच्या मनातील ते निर्णय घेत आहे. राजा उदार झाला आहे. लोकांच्या अडीअडचणी जाणून निर्णय घेणारा मंत्री नंबर वनच्या खुर्चीकडे जावा अशी भावना व्यक्त करून जयंत पाटील यांनी वरच्या लोकांनी माझी सूचना व भाषण ऐकावे असे सांगून बावनकुळे यांचे राजकीय वजन आणखीच वाढवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com