Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

Chandrashekhar Bawankule : कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावरून सरकार बॅकफूटवर, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मागितली माफी!

Manikrao Kokate chandrashekhar Bawankule Apologizes : विजय वडेट्टीवार यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, कृषिमंत्र्यांची असंवेदनशील दिसून येत आहे.
Published on

Chandrashekhar Bawankule News :राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा महायुती सरकारवर खुलासा करण्याची वेळ आली आहे. कोकाटे यांचे वक्तव्य दुर्दैवी असून सरकारच्यावतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली आहे.

'कोकाटे यांनी असे वक्तव्य करायला नको होते. ते असे बोलले असतील तर आम्ही माफी मागतो.', असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

'अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. यावर कोणी राजकारण करू नये.', असा सल्लाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

Chandrashekhar Bawankule
Anjali Damania-Arjun Khotkar : शिवसेनेचा 'अर्जुन' संकटात! रामनगर कारखान्याचे प्रकरण दमानियांनी पुन्हा काढले

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कोकाटे यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची असंवेदनशील यातून दिसून येत आहे. बहुमत असल्याने ते अरेरावीची भाषा करीत असल्याचेही सांगितले.

कोकाटे नेमकं काय म्हणाले?

एका शेतकऱ्याने कर्जमाफी कधी होणार, असे विचारले असता कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, जे नियमितपणे कर्ज भरतायत त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघायची. पण कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असेही मंत्री कोकाटे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Manikrao Kokate : कृषिमंत्रीसाहेब, पोशिंद्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे धाडस कुठून आले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com