Maharashtra Politics : "बावनकुळे-धस-मुंडेंच्या भेटीमागे कुछ तो गडबड है..." काँग्रेसच्या बड्या नेत्याला वेगळाच संशय

Suresh Dhas Dhananjay Munde Meeting Controversy : धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीमुळे आता नवा वाद भाजपमध्ये उफाळून आला आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या भेटीचा खुलासा केल्याने वादाचा फोकस बदलला आहे.
Suresh Dhas, Chandrashekhar Bawankule, Dhananjay Munde
Suresh Dhas, Chandrashekhar Bawankule, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 19 Feb : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या आणि पिक विमा योजनेतील घोटाळ्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत.

महिनाभरापासून दोघांमध्ये रोजच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना अचानक या दोन्ही नेत्यांची भेट झाली. या भेटीची गोपनीयता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीच उघड केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या सर्व घडामोडींमागे ‘कुछ तो गडबड है, अशी शंका काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केली. सोबतच धस यांना प्रदेशाध्यक्षांवर आक्षेप घेण्यासाठी कोण बळ देत आहे? असाही सवाल उपस्थित केला.

धनंजय मुंडे आणि सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या भेटीमुळे आता नवा वाद भाजपमध्ये उफाळून आला आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या भेटीचा खुलासा केल्याने वादाचा फोकस बदलला आहे. सुरेश धस सातत्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि एक रुपया पिक विमा योजनेवरून मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करीत होते.

Suresh Dhas, Chandrashekhar Bawankule, Dhananjay Munde
Chhaava : जरांगे पाटलांनी टायमिंग साधलं! शिवजयंती दिवशीच 'छावा' सिनेमाबाबत सरकारकडे केली मोठी मागणी

दोघांमधील वाद चांगलाच उफाळून आला होता. हा वाद विकोपाला गेला असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांची भेट झाल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. चार तास दोघांमध्ये चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे धस चांगलेच अडचणीत आले आहेत.

जरांगे पाटील यांनीसुद्धा धस यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे धस यांनी वीस मिनिटे भेट झाली असताना चार तास बोललो कसे काय म्हणाले असे सांगून त्यांनी डाव उलटवला आहे. आमदार धस प्रदेशाध्यक्षांवर आक्षेप घेत असतील तर त्यांना इतके बळ कोण देत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

धस रोज मुंडे यांच्यावर आरोप करत होते. मुंडे यांचे छोटेसे ऑपरेशन झाले असताना ते त्यांना भेटणे हेच कोणाला पटण्यासारखे नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. राज्यात महायुतीमध्ये सारखी धुसफूस दिसत आहे. तीन तोंडी सरकारची तिन्ही तोंडे तीन दिशेला आहेत. कोणत्याही निर्णयात सरकारमध्ये एकवाक्यता नाही.

Suresh Dhas, Chandrashekhar Bawankule, Dhananjay Munde
Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकर क्लिन चीट प्रकरण; उदयनराजे संतापले, म्हणाले, "पुण्याच्या पोलिस आयुक्तांचं डोकं..."

महायुती सरकारचे अध:पतन असेच होणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यात या सरकार मधील मंत्र्यांना रस आहे. त्यामुळे जनता यांना धडा शिकवेल अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला, याचा निषेध आम्ही करतच आहोत, पण अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. फक्त छत्रपतींचे नाव घेऊन उपयोग नाही, त्यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com