Gadchiroli News : गडचिरोलीत स्टील प्लांटचे उद्‌घाटन होताच कोलकत्ता, बंगळुरूमधून पोस्ट पडल्या; फडणवीसांनी सांगितली ‘ती’ गोष्ट

Devendra Fadnavis statement : अफवांच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करायचा आणि आदिवासी गोरगरिबांना आयुष्यभर विकासापासून वंचित ठेवायचे, गुलाम ठेवायचे असा यांचा हेतू आहे. अशा मानसिकतेच्या विरोधात आपण लढा उभारला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 22 July : महायुती सरकारच्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात काँग्रेस एकवटली आहे. या विरोधात आंदोलने केली जात आहेत. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्यासाचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप विरोधकांच्या वतीने केला जात आहे. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आपल्याला शहरी माओवाद्यांपासून सजग राहावे लागेल, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे जनसुरक्षा कायद्याचे जोरदार समर्थन केले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मंगळवारी गडचिरोली येथे स्टील प्लांटचे भूमिपजून करण्यात आले, त्यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात माओवादाचा उल्लेख केला. ते म्हणाले, बंदुकीचा माओवाद संपुष्टात आणल्याने आता नवे अस्र त्यांनी हाती घेतले आहेत. हे लोक फार हुशार आहेत. गडचिरोली विकासाच्या एका प्लांटचे उद्‍घाटन करताच दुसऱ्याच दिवशी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकणे सुरू केले. आता आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जाणार, त्यावर प्लांट उभे केले जाणार, त्यांना चिरडून टाकणार असे कँपेन सुरू झाले होते. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटले. हे नेमके कोण करीत आहे, या मागे कोण याचा शोध घेण्यास पोलिसांना सांगितले.

पोलिसांच्या तपासात पोस्ट टाकून लोकांना भडकावणारे दोघे कोलकत्ता, तर दोघे बंगळूरूमध्ये बसून पोस्ट टाकत असल्याचे समोर आले. त्यासाठी त्यांना परदेशातून फंडिग केले जात होते. समाज माध्यमांवर पोस्ट टाकून संविधानाच्या विरोधात भडकवायचे, लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांना सोपवण्यात आले होते. गडचिरोलीत (Gadchiroli ) विकासाचा प्रकल्प आला तर सत्यानाश होईल असा समज निर्माण केला जात होता, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

अफवांच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करायचा आणि आदिवासी व गोरगरिबांना आयुष्यभर विकासापासून वंचित ठेवायचे, गुलाम ठेवायचे असा यांचा हेतू आहे. अशा मानसिकतेच्या विरोधात आपण लढा उभारला आहे. अशा शहरी नक्षलवाद्यांपासून यापुढे आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

जल, जमीन आणि जंगल या संपत्तीचा विनाश न करता गडचिरोलीचा विकास करायचा आहे. या परिसरात एक कोटी रोपे लावली जाणार आहेत. त्यापैकी ४० लाख रोपे लावण्याचा आजच शुभारंभ केला जाणार आहे. कोणी विचारही केला नसले तेवढा विकास येत्या काळात गडचिरोलीत बघायला मिळणार आहे.

यापूर्वी माओवादीग्रासीत जिल्हा म्हणून गडचिरोलीला संबोधले जायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. अधिकारीसुद्धा आता या जिल्ह्यात पोस्टिंग मागत आहेत. हा बदल संविधानाने झाला आहे. लोकांनी माओवाद्यांची साथ सोडली आहे, त्यांनी आपण संविधानासोबत असल्याचे दाखवून दिले आहे.

लॉयड कंपनीने ज्यांना बंदुका टाकल्या, ट्रेनिंग देऊन त्यांचे जीवन बदलले आहे. कुठल्याही परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्याला माओवादमुक्त करणारच आहोत. आज जे काही बोटावर मोजण्याइतपत उरले आहेत, त्यांनीही मुख्यधारेत यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. असे असले तरी यापुढे आपल्याला शहरी माओवादापासून सजग राहावे लागेल, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com