Nagpur News, 17 July : नक्षलग्रस्त आणि मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला लवकरच महाराष्ट्रातील पहिला जिल्हा होणार. या जिल्ह्याला 'स्टील सिटी' अशी नवी ओळख आम्ही देणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी विधानसभा मतदारसंघात सूरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्पाचे भूमिपूजनासठी देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी बोलताना त्यांनी गडचिरोली जिल्हा 'स्टील सिटी' होणार असल्याचं म्हटलं.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, सूरजागड प्रकल्पात 8 मिलियन टन लोह खनिजावर प्रक्रिया केली जाणार आहे. 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात होणार असून सुमारे 10 हजार लोकांना रोजगारही मिळणार आहे. याशिवाय लॉईड स्टील कंपनीत 4 मिलियन टन लोह खनिजावर प्रक्रिया केली जात आहे. अशी एकूण 12 मिलियन टन लोहखनिजावर येथे प्रक्रिया होणार आहे.
गडचिरोलीत (Gadchiroli) एकूण 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याने या जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. भविष्यात राज्यातील पहिला जिल्हा आणि विकसित जिल्हा म्हणून गडचिरोलीला विकसित करण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे. जल, जमीन आणि जंगल यावर पहिला अधिकार गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा आहे. त्यामुळे नोकऱ्यांमध्ये 80 टक्के स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
तसंच याबाबत कंपन्यांसोबत सामंजस्य करार करतानाच ही अट घालण्यात आली आहे. कौशल्याची गरज असेल तर कंपन्यांच्याच माध्यमातून स्थानिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आदिवासींच्या ठाकूर देव देवस्थानाला या प्रकल्पासासून आणि खाणीपासून कुठलाही धोका होणार नाही. याची काळजी आम्ही घेतली आहे. देवस्थानाला धोका होणार फक्त अफवा आहेत. आदिवासींच्या जमिनी आणि जंगलाच्या शेजारी कुठलेही खोदकाम होऊ देणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.