Eknath Shinde : मुख्यमंत्री चंद्रपुरात येताच पोलिसांनी केली कारवाई; ‘आप’च्या नेत्यांना घेतले ताब्यात

Vidarbha Political News : ओव्हर ब्रीजच्या कामासाठी करणार होते आंदोलन...
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चंद्रपूर दौऱ्यादरम्यान आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या आम आदमी पार्टीच्या नेते, पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी (ता. 27) स्थानबद्ध केले. चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील बाबूपेठ येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम काही वर्षांपासून रखडले आहे. काम रखडल्याने याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात चार जणांचा प्राणही गेला होता.

सततच्या घडणाऱ्या या अपघातांमुळे आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) आक्रमक भूमिका घेतली. बुधवारी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चंद्रपुरात आलेत. त्यावेळी ‘आप’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फलक लावत त्यांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

Eknath Shinde
Loksabha Election : माढ्याच्या उमेदवारीचा सस्पेन्स आणखी वाढला; निंबाळकर, मोहिते पाटलांनी लावली जोरदार 'फिल्डिंग'

आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे म्हणाले की, रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी वरोरा-चंद्रपूर बल्लारपूर टोलरोड कंपनीची (WCBTRL) आहे. मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभागाने देखील कंपनीवर कारवाई केली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि रामनगर पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिल आहे. त्यानंतरही कारवाई झालेली नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे आम आदमी पार्टीने निषेध आंदोलन केले.

कुडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या पदाधिकरी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, जिल्हा संघटनमंत्री नागेश्वर गंडलेवर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर, जिल्हा सचिव राजकुमार नागळाले, प्रशांत शिदूरकर, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, बल्लारपूर शहर सचिव ज्योती बाबरे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, अशोक माहूरकर, अश्रफ शेख, शगीर सय्यद, सिकेंदर सागोरे, सुनील सदभय्या, सुजित चेडगूलवार, अनुप तेलतुमडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चंद्रपुरात दाखल होण्यापूर्वीच या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अनेक तासांपर्यंत स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. रात्री दहापर्यंत आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात ठेवले होते. त्यानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी यावेळी निषेध केला.

राज्याचे प्रमुख या नात्याने आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचे होते. मात्र पोलिसांनी कारवाई केली. नागरिकांच्या समस्यांसाठी आम्ही हे पाऊल उचलले. ‘आप’मधील कोणीही कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही. त्यानंतरही पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde
Thackeray vs BJP : PM मोदी-डिनो मोरियाच्या फोटोवरून वाद; 'बार्किंग ब्रिगेड' म्हणत अंधारेंची नितेश राणेंवर बोचरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com