ऑनलाईन सभेतच नगरसेवकचे धूम्रपान : चित्रा वाघ संतापल्या

महापालिकेच्या (Municipal Corporation) ऑनलाइन सभेत काॅंग्रेस (Congress) नगरसेवक पुणेकर यांनी सिगरेट ओढत बेफिकीरपणाचा दाखला दिला, अशी टिका भाजपच्या (BJP) प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे.
Chirta Wagh and Ramesh Punekar
Chirta Wagh and Ramesh PunekarSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : महानगरपालिकेच्या (Municipal corporation) ऑनलाइन सभेमध्ये कॉंग्रेसचे (Congress) नगरसेवक रमेश पुणेकर सिगरेटचे झुरके मारताना आढळले. विशेष म्हणजे यावेळी विरोधी पक्ष नेते म्हणजे त्यांच्याच पक्षाचे तानाजी वनवे यांचे भाषण सुरू होते. यावर महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) नशा उतरत नाही, तोच नागपूर महापालिकेच्या ऑनलाइन सभेत पुणेकर यांनी सिगरेट ओढत बेफिकीरपणाचा दाखला दिला, अशी जळजळीत टिका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, अशा नगरसेवकावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. कारण ऑनलाइन असो की ऑफलाइन, सभेचे महत्व कुठेही कमी होत नाही. भर सभेत अशी वर्तणूक करणारे स्वतःला जनतेचे सेवक म्हणवून घेतात. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची वाईनची नशा अद्याप उतरलेली नाही. अन् कॉंग्रेसचे हे नगरसेवक चक्क ऑनलाइन सभेत सिगरेट ओढत होते. धूम्रपान कायदा पायदळी तुडवत कॉंग्रेसचं दम मारो दम सुरूच आहे. दुपारी ऑनलाइन सभेत झुरके मारल्यानंतर सायंकाळपर्यंत पुणेकरांचे हे झुरके शहरभर पोहोचले अन् त्यानंतर राज्यभर. आज चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले.

महापालिकेच्या सभेत सहभागी होतानाही सदस्य गंभीर नसल्याची चर्चा रंगली आहे. कचरा संकलन करणारी एजी एन्व्हायरो व बीव्हीजी इंडिया कंपनीचा कंत्राट रद्द करणे, नव्या कंपनीची नियुक्ती करणे, यावर शनिवारी महापालिकेची विशेष सभा ऑनलाइन पार पडली. या सभेत महापौरांसह आयुक्त राधाकृष्णन बी., सर्वच अतिरिक्त आयुक्त, विविध विभागप्रमुख, गटनेते व सदस्य घरूनच ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. सभेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे या कंपन्यांकडून होणारा अटीचा भंग, नियमाची पायमल्ली आदींवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्याच कॉंग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक २० मधील नगरसेवक रमेश पुणेकर सिगरेट ओढताना स्क्रीनवर दिसून आले.

Chirta Wagh and Ramesh Punekar
"BJP फ्लॉवर नहीं फायर है" : चित्रा वाघ यांना 'पुष्पा'ची आठवण

पुणेकर सिगरेट ओढताना काही नगरसेवकांनी बघितले. परंतु कुणीही सभेदरम्यान, त्यांच्यावर ताशेरे ओढले नाही किंवा त्यांचे ते स्क्रीनवर दिसत असल्याकडे लक्ष वेधले नाही. या स्क्रीनवर महापौर व इतर दोन नगरसेवक दिसत आहे. नेमके याचवेळेला कुणीतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात सायंकाळपर्यंत अनेकांच्या मोबाईलवर दिसून आले. महापालिकेची सभेसाठी उपस्थित राहताना धूम्रपान आदी न करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या परंपरेलाही पुणेकर यांच्या कृत्याने तडे गेले आहे. विशेष सभेत गंभीर विषयावर चर्चा केली जाते. विशेष सभेच्या गांभीर्यालाही धक्का बसला असून पुणेकर यांच्या वर्तनाने नगरसेवकांच्या प्रतिमेलाही तडा गेल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com