Devendra Fadnavis On OBC : 'गैरसमज दूर झाला, आता उपोषणही मागे घ्यावं..', मुख्यमंत्र्यांचं ओबीसी समाजाला आवाहन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान त्यांना रसद पुरवणाऱ्यांवर आमची नजर असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटले होते. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी जेव्हा चांगल्या गोष्टी करतात तेव्हा फार खोलात जाऊ नये, असे सांगून आता याकडे दुर्लक्ष केले जाईल असेही सूचित केले.
Devendra Fadnavis And OBC
Devendra Fadnavis And OBC Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्या जाईल, त्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाईल हा गैरसमज आता दूर झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाला साखळी उपोषण करण्याची गरज नाही, त्यांनाही मी आश्वस्त करतो असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी महासंघाला उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने ३० ऑगस्टपासून संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. जरांगे यांच्या दबावात येऊन त्यांनी मागणी सरकार मान्य करणारर्सल्याची भीती व्यक्त करून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात हे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आमरण उपोषणासाठी मुंबईत कूच करण्यचा निर्णय जाहीर करण्यात आला होता

मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करणार नाही असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांचीच दिले होते याचे स्मरणही या दरम्यान करून देण्यात आले आहे. मंगळवारी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी असलेल्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र दिले जाईल आणि त्यांना आरक्षणाचा लाभ दिला जाईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. त्यांची सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य करण्यात आलेली नाही.

संविधानानुसार समूहाला आरक्षण देता येत नाही असे त्यांना पटवून देण्यात आले आहे. ते जरांगे पाटील यांनीसुद्धा मान्य केले आहे. त्यामुळे आता ओबीसींनी (OBC) घारबण्याचे कारण नाही. ओबीसीच्या आरक्षणात मराठा समाजाला वाटेकरी केले जाईल हा त्यांचा गैरसमज आता दूर झाला आहे. त्यामुळे साखळी उपोषण मागे घ्यावे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis And OBC
Maratha Reservation : मराठा समाजाची 'जीआरमध्ये' फसवणूक झाली? जरांगेंना विखे पाटलांच्या घरी उपोषण करावंच लागणार?

ओबीसी समाजाला मी आश्वस्त करतो. आमचे सरकार आहे तो पर्यंत दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभा राहणार, आम्ही असे कधीही होऊ देणार नाही. महाराष्ट्राची सामाजिक वीण हे सोशल फॅब्रिक आहे. ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले.

या निर्णयामध्ये दोन्ही नेते माझ्या पाठीशी होते. आम्ही तिघांनी मंत्रिमंडळ उपसमितीला अधिकार दिले होते. मराठा समाजाचे जे काही प्रश्न आहे, ते सोडवण्याचा प्रयत्न आमचा आहे. मराठा समाजाला जे काही देता येते ते आम्ही दिले. मागील काळात दीड लाख मराठा तरुणांना उद्योजक केले. सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेतून मराठा समाजाला टक्का वाढवलेला आहे. मराठा हिताचे निर्णय ज्यावेळेस घेण्याची वेळ आली ते आम्ही घेतलेले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis And OBC
Radhakrishna Vikhe Patil: फडणवीसांचा यशस्वी डाव,मुत्सद्दी विखे पाटलांनी बाजीच पलटवली; सरकारच्या हाताबाहेर चाललेलं जरांगेंचं आंदोलन संपवलं

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान त्यांना रसद पुरवणाऱ्यांवर आमची नजर असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटले होते. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्र्यांनी जेव्हा चांगल्या गोष्टी करतात तेव्हा फार खोलात जाऊ नये, असे सांगून आता याकडे दुर्लक्ष केले जाईल असेही सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com