
Nagpur News : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेय लाटण्याची स्पर्धा लागली असते. आपणच आणि आपल्यामुळेच आणि आपल्याचा कार्यकाळात सर्व झाले आणि सर्वात चांगले काम झाल्याचा दावा केला जातो. दुसऱ्या कुणाला क्रेडिट मिळू नये याची खबरदारी घेतली जाते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचे वाघनखे आणण्याचे संपूर्ण क्रेडिट माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना देऊन त्यांच्यासोबत कुठलीही राजकीय स्पर्धा आणि अढी नसल्याचे सुतोवाच केले.
महायुतीच्या कार्यकाळात सुधीर मुनगंटीवार हे सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. त्यांनीच शिवरायांची वाघनखे आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. ते महाराष्ट्रात आणलीसुद्धा होती. त्यावेळी ही वाघनखे शिवरायांची नसल्याचा वादही निर्माण झाला होता. त्यावरून विरोधकांनी आरोपही केले होते. दरम्यान, महायुतीचे पुन्हा राज्यात सरकार आले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले.
अनुभव आणि ज्येष्ठत्व या नात्याने मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश राहील असेच सर्वांना वाटत होते. मात्र, मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर अनेकांचा पत्ता कापल्या गेला होता. त्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश होता. भुजबळांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकला निघून गेले होते. ओबीसींचा मेळावा घेऊन त्यांनी बंडाचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. मुनगंटीवार यांनी आपली नाराजी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभाही न होऊन दर्शवली होती. या दरम्यान त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेटसुद्धा घेतली होती.
मंत्रिमंडाळाच्या यादीत माझा समावेश होता. मला तसे कळवण्यात आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यासोबत दोन तास चर्चा केली होती, तसेच मंत्रिमंडळात तुमचे नाव असल्याचे सांगितले होते असाही दावा केला होता. वक्त आयोगा, वक्त जायेगा अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुनगंटीवार यांनीही अप्रत्यक्षपणे नाराजी दर्शवली होती.
फडणवीस यांनी यावर माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे, त्यांना मोठे पद देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आपली मुख्यमंत्र्यांसोबत भेटच झाली नसल्याचे सांगून मुनगंटीवार यांनी भाजपला उघडे पाडले होते. त्यामुळे भाजपमध्ये चांगलीच अस्वस्था निर्माण झाली होती.
सध्या मुनगंटीवार यांनीसुद्धा आपली शाब्दिक तलवार म्यान केली आहे. हे बघता मंत्रिमंडावरून भाजपातील अंतर्गत वाद क्षमला असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवरायांच्या वाघनखांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात वाघनखे आणण्याचे सर्व श्रेय मुनगंटीवार यांना देऊन नव्याने संवादाला सुरुवात केली असल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.