Mahayuti alliance break : शिंदे सेनेने नगराध्यक्षपदासाठी उभे केले 25 उमेदवार; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महायुती तुटली

Shinde Shivsena Breaks Mahayuti in Nagpur by Fielding Candidates in 25 Municipalities Devendra Fadnavis Home Ground : नागपूर जिल्ह्यातील 27 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 25 नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
Devendra Fadnavis Nagpur
Devendra Fadnavis NagpurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur municipal elections : भाजप प्रतिसाद देत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीच्या चर्चा सुरू असतानाचा शिंदे सेनेच्यावतीने आज नागपूर जिल्ह्यातील 27 स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी 25 नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.

भाजपने स्थानिक नेत्यांना अधिकार दिले असल्याचे सांगून आधीपासूनच महायुतीपासून लांब राहण्याची काळजी घेतली होती. दुसरीकडे अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही जुळवाजुळव करीत काही ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले आहेत. हे बघता महायुती तुटल्याचे स्पष्ट झाले असून आता महायुतीला आपसात लढावे लागणार आहे.

भाजप (BJP) फारसा प्रतिसाद देत नसल्याने शिंदे यांच्या सेनेने ज्या नगर परिषदेत पक्षाची ताकद जास्त आहे त्या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. उर्वरित जागी राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षासोबत युती केली जाईल असेही ठरवण्यात आले होते. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन शिवसेनेने स्वबळासाठी पुढचे पाऊल टाकले होते.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील 15 नगर परिषदा आणि 12 नगर पंचायतीमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आपसात बैठक घेऊन युती करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपकडे प्रस्ताव दिला जाणार होता. तो स्वीकारला नाही आणि सन्मानजनक जागा दिल्या नाही तर युतीमध्ये आणखी काही संघटना व पक्षांना सोबत घेण्याचे ठरले होते. मात्र शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन 25 ठिकाणी आपले उमेदवार उभे केले.

Devendra Fadnavis Nagpur
Ravindra Chavan Decision : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजप प्रवेश; टीका होताच प्रदेशाध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या रामटेक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कन्हान आणि कांद्री या दोन पालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने युती केली आहे. नरखेड, कामठी, कन्हान, मोहपा आणि कळमेश्वर या पालिकेमध्ये मात्र राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis Nagpur
Devendra Fadnavis Narco Test : देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा; काँग्रेस नेत्याच्या मागणीनं खळबळ

भाजपने आधीपासूनच आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लावले होते. शक्य तिथे महायुती करून असे भाजपचे नेते सांगत होते. दुसरीकडे स्थानिकांना अधिकार दिल्याचेही सांगण्यात येत होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच महायुतीबाबत संभ्रम होता. सोमवारी उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी मात्र भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपाले उमेदवार उभे केल्याने महायुती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com