
Mahayuti Government : महायुती सरकार स्थापन झाले तेव्हा, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक दिग्गजांचा पत्ता कापला होता. त्यामुळे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ अधिवेशन सोडून निघून गेले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांनाही वेगवेगळ्या वक्तव्यातून आपली नाराजी प्रकट केली होती. आजही अधूनमधून नाराजीचा सूर उमटतच असतो.
ही नाराजी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला जाहीर केला होता, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्र्यांचा परफॉर्मन्स बघून मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील, असे सूचित केले होते. सोबतच शंभर दिवसांचा कार्यक्रमाही आखून दिला होता. याबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मोठे वक्तव्य केले असून त्यामुळे अनेकांना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंत्री उईके म्हणाले, "महायुतीमधील (Mahayuti) मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यांकन होत आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र निष्क्रिय मंत्र्यांना देवाभाऊ सोडणार नाहीत. ते जो काम करणार नाही त्यांना काम करायला लावणार आहेत. राज्याच्या विकासासाठी स्वतः धावत आहेत आणि सर्व मंत्र्यांनासुद्धा धावायला लावत आहे. त्यांच्या वेगासोबत आदिवासी विभागसुद्धा धावण्याचा प्रयत्न करीत आहे".
आम्ही आदिवासी विभागात अनेक बदल केले आहेत. ते लवकरच जाहीर केले जातील. मात्र शंभर दिवसांच्या फरफॉर्मन्समध्ये आदिवासी विभाग पहिल्या पाचमध्ये असेल, असा दावाही उईके यांनी केला.
आदिवासी खात्याचे मंत्री झाल्यानंतर अशोक उइके यांनी रात्रभर आश्रमशाळेत मुक्काम करून विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यांच्यासबोत भोजनाचा आस्वाद घेऊन अप्रत्यक्षपणे भोजनाचा दर्जासुद्धा तपासला होती. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळांना भोजनाचा पुरवठा कंत्राटदार चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.
आदिवासी खात्याला राज्याच्या एकूण रकमेच्या अर्थसंकल्पापैकी सुमारे साडेनऊ टक्के निधी मिळतो. तो देणे राज्य शासनाला घटनेनुसार बंधनकारक आहे. याशिवाय पाच टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. प्रचंड निधी उपलब्ध होत असताना साठ वर्षांत आदिवासी समाजाचा त्या तुनलेत सामाजिक व आर्थिक विकास झाला नाही. त्यामुळे हा निधी कुठे मुरत आहे याचा शोध अशोक उईके सध्या घेत असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.