Sanjay Raut : 'लाडक्या बहि‍णीं'चे सत्ताधारी भाऊ राज्याला दारूडा करणार; DCM पवारांचा 'तो' निर्णय दुर्दैवी ठरेल, राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut on DCM Ajit Pawar Decision: राज्याच्या महसूल वाढीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मद्यविक्रीचे नवीन परवाने देण्याच्या प्रस्तावावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.
Sanjay Raut | Ajit Pawar
Sanjay Raut | Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील वित्त आणि नियोजनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी महसूल वाढीसाठी मद्यविक्रीचे नवीन परवाने सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला. 'लाडक्या बहिणींच्या सत्ताधारी भावांचा राज्याला दारूडे करण्याचा हा प्रयत्न ठरेल', असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे भाऊ त्यांच्या नवऱ्यांना दारूडे करणार आहे. दारू प्या! पंधराशे रुपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारूडा करणारी योजना असेल, तर ते अत्यंत गंभीर आहे. ड्राय-डे कमी करणार हे देखील मी ऐकले आहे.

हाॅटेल, रेस्टाॅरंटमधील दारूविक्रीवर बंदी कमी करत आहेत. शाॅप आणि माॅलमधून दारू विक्रीवर प्रस्ताव आहे. घरपोच दारू काही राज्यात आहे. काही करून लाडक्या बहिणींना पंधराशे देण्यासाठी घराघरात दारू पोचवा, हे नवीन व्हिजन दिसते".

Sanjay Raut | Ajit Pawar
Maharashtra Politics News LIVE Updates : पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार

'म्हणजे, बहिणींना पंधराशे द्यायचे आणि त्याबदल्यात बहिणींच्या घरांमध्ये दारूडे निर्माण करायचे, नवरे, भाऊ, मुलं, अशी योजना पैसे कमवण्याची दिसते. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारं आहे. अजित पवारांसारखा (Ajit Pawar) नेता हा विचार करत असेल, महसूल वाढीसाठी हा विचार करत असेल, तर ते राज्यासाठी दुर्दैवी ठरेल', असे संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut | Ajit Pawar
TOP Ten News - जयकुमार गोरेंचे रामराजेंबाबत मोठे विधान; उद्धव ठाकरेंनी अजमेर शरीफ दर्गाला पाठवली चादर! - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खरोखरच, असा विचार करत असतील तर, यशवंतराव चव्हाण यांचे , ते नेहमी नाव घेतात. फुले-शाहू-आंबेडकर नेहमी म्हणत असतात. त्यांच्या होर्डिंग, कार्यक्रमात फुले-शाहू-आंबेडकर यांचे फोटो असतात. ते अगोदर लावणं बंद करावे, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.

राऊतांचा बहिणींना चिंतनाचा सल्ला

लाडकी बहीण योजनांचे निकष कठोर केले जात आहे, यावर संजय राऊत म्हणाले, "भविष्यात अशी योजना ते बंद करू शकतात. लाखो-हजारो कोटींचे ओझे आहे. भ्रष्टाचाराची लुटमार सुरू आहे. राज्य चालवणे सोपं नाही. निवडणुकीअगोदर कोणतेही निकष लावले नाहीत. मतांसाठी पैसे वाटले. आता निवडणुका जिंकल्यावर तुम्ही निकष लावत आहात. त्यात दारू दुकानांचे परवाने वाढवणे अत्यंत गंभीर मुद्दा आहे.

बहिणींनी पंधराशे रुपयात कोणते विष घरात आणत आहोत, याचे आता चिंतन केले पाहिजे. हे सरकार चांगल्या मनाने पैसे देत नाही". महाराष्ट्र, देशात महागाई उच्चांक गाठलेला आहे. राहुल गांधी मंडईत गेले, तेव्हा आम्हाला देखील कळाले की, महागाई किती वाढली आहे, असेही राऊत यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com