CM Devendra Fadnavis : 'औरंगेजबाच्या कबरीला संरक्षण मात्र उदात्तीकरण...', मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा

CM Fadnavis Devendra On Aurangzeb Grave : औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाने ही कबर उखडून फेकण्याची मागणी केली, यावर CM देवेंद्र फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंगदलाने ही कबर उखडून फेकण्याची मागणी केली. यावरून नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. त्यामुळे कबरीबाबत राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकणार नाही, हे स्पष्ट करताना उदात्तीकरणसुद्धा खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, औरंजेबाची कबर प्रोटेक्टेड आहे. आम्हाला औरंगजेब आवडो अथवा न आवडो कायद्याने साठ वर्षांपूर्वी त्याला प्रोटेक्शन मिळाले आहे. म्हणून कबरीच्या संरक्षणाबाबत जो कायदा असेल त्याचे पालन करणे आमची जबाबदारी आहे. मात्र यावर कोणी राजकारण करीत असेल आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करीत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही.

Devendra Fadnavis
BJP Politics : थेट मोदींना आव्हान देत प्रदेश नेतृत्वावर हल्ला; अशी आहे हकालपट्टी झालेल्या आमदार पाटलांची राजकीय कारकीर्द… 

लोकसभेच्या निवडणुकीपासूनच औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारणाला सुरुवात झाली होती. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या कबरीला भेट दिली होती. दुसरीकडे मंत्री नीलेश राणे यांनी ही कबर उखडूण फेण्याची मागणी केली होती. त्यावर अबू आझमी यांनी आक्षेप घेतला होता. विधानसभेत अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले होते.

औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू असताना नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनीसुद्धा या मुद्याला हात घताला. अचानक औरंगजेबाची कबर चर्चेत कशी आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे फलक या कबरीजवळ लावण्याची सूचना त्यांनी केली.

बुलडोझर कारवाई नियमानुसार

या सर्व घडामोडी आणि औरंजेबाच्या कबरीवर आज (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. अजानासाठी मशिदीत वापरल्या जाणाऱ्या भोंग्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालन केले जाईल तसेच बुलडोजर कारवाई गरज भासेल तेव्हा नियमानुसार केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Walmik Karad Attack : मोठी बातमी! बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला मारहाण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com