Navneet Rana : मुख्यमंत्री शिंदे, अजितदादांचा इशारा नवनीत राणांनी झुगारला; महायुतीच्या विरोधात प्रचार सुरूच!

Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंबी देऊनही राणा दाम्पत्य भाजपच्या बंडखोराचा प्रचार करीत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे.
Navneet Rana
Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान होणार असल्याने राज्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षाकडून जोर लावला जात असल्याने निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीकडून प्रचार जोरात सुरु असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तंबी देऊनही राणा दाम्पत्य भाजपच्या बंडखोराचा प्रचार करीत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे.

दर्यापूरमध्ये महायुतीकडून शिंदे शिवसेनेने (Shivsena)अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांनी बंडखोरी करत युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारी घेतली आहे. दरम्यान, त्याच रमेश बुंदीले यांचा प्रचार करण्यासाठी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदार संघात प्रचार सभा घेतल्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांची दर्यापूरमध्ये सभा झाली. ज्यामध्ये शिंदेंनी महायुतीचा धर्म पाळावा, असा दम राणा दाम्पत्यांना दिला. तरीही नवनीत राणा यांनी रमेश बुंदीलेसाठी दोन ठिकाणी सभा घेतल्या आहेत. त्यामुळे अमरावतीत महायुतीत सारे काही अलबेल दिसत नाही.

Navneet Rana
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुद्दाम 'टार्गेट'? आधी बॅगांची तपासणी, आता राणेंच्या बालेकिल्ल्यात थेट ताफाच अडवला

बडनेराचे उमेदवार रवी राणा यांनी अमरावतीच्या भाजप कार्यालयात काही दिवसांपूर्वी बैठक घेतली. त्यामध्ये रवी राणा यांनी अमरावतीची एक जागा कमी झाली तरी चालेल पण कमळ निवडून आले पाहिजे, असे वक्तव्य केलं होते. त्यानंतर महायुतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुलभा खोडके विरुद्ध राणांमध्ये खडाजंगी रंगली असताना अजित पवारांकडून रवी राणांची कानउघडणी केली आहे.

Navneet Rana
Aditya Thackeray: गद्दारांना बर्फाच्या लादीवर बसवणार; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला

त्यानंतर मंगळवारी भर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याला इशारा देत महायुतीची शिस्त पाळण्याचा सल्ला दिला. मात्र अजित दादांनी दिलेली तंबी आणि मुख्यमंत्र्यांचा इशारा हवेतच विरला का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कारण दर्यापूरमधील महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उभे असलेले भाजपमध्ये बंडखोरी करणारे रमेश बुंदीले यांच्या प्रचार नवनीत राणा करत असल्याचे दिसून आले आहे.

Navneet Rana
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुद्दाम 'टार्गेट'? आधी बॅगांची तपासणी, आता राणेंच्या बालेकिल्ल्यात थेट ताफाच अडवला

लोकसभेत महायुतीचे सरकार तुमच्या पाठीशी उभे राहिले, महायुतीमध्ये कॅप्टन अभिजीत असून ते देखील आमच्या सरकारसाठी गरजेचे आहेत. महायुतीची शिस्त राणा दाम्पत्याने पाळावी. महायुतीत राहून बंडखोरी करू नये, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे.येत्या काळात महायुतीच्या कामाची पोच पावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार सर्वसामान्य जनतेसाठी आहे. मतदारसंघातले सगळे प्रश्न आपण मार्गी लावू. त्यासाठी 20 तारखेला कॅप्टन अभिजीत अडसूळ यांचं विमान उडवा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी जनतेला केले आहे. त्यामुळे दर्यापूर येथील निवडणुकीत काय हॊणार ? याची उत्सुकता लागली आहे.

Navneet Rana
Nitin Gadkari : टीव्ही फोडण्याची धमकी दिली म्हणून बापाने दिले मुलाला तिकीट; नितीन गडकरी यांची टोलेबाजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com