Aditya Thackeray: गद्दारांना बर्फाच्या लादीवर बसवणार; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला

Aditya Thackeray attacks Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत मुंबईत प्रचारासाठी धुरा संभाळत असलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना इशारा.
Aditya Thackeray | Eknath Shinde
Aditya Thackeray | Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वातावरण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ढवळून काढण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांना थेट अंगावर घेण्यास सुरवात केली आहे.

मुंबईतील भायखळा इथल्या प्रचारादरम्यान आदित्य ठाकरे यांनी राजकीय खळबळ उडवून देणारं विधान केलं. "ज्यांनी महाराष्ट्र लुटला आणि तोडला, त्यांना मी बर्फाच्या लादीवर टाकून तुरुंगात टाकेन. मी तुम्हा हे वचन देतो", असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले.

शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुंबईतील प्रचाराची धुरा आदित्य ठाकरे संभाळत आहे. स्वतःच्या मतदारसंघासह ते इतर मतदारसंघात देखील उमेदवारांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. भायखळा इथं झालेल्या प्रचारसभेत त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर थेट हल्ला चढवला. या सभेतील विधानामुळे मुंबईतील शिवसेनेचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Aditya Thackeray | Eknath Shinde
Mumbai Political Families: ठाकरे, सरदेसाई, राऊत यांच्यासह 'या' नेत्यांची नातीगोती निवडणुकीच्या मैदानात

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, "गेल्या दोन वर्षांत भाजपने आमच्याविरुद्ध बरेच षडयंत्र रचली. पण आम्ही तुटलो नाही. आम्ही महाराष्ट्राच्या धर्माशी एकनिष्ठ आहोत, तो आम्हाला माहीत आहे आणि तो आम्हाला पुढे न्यायचा आहे". आम्ही हिंदुत्वाचे समर्थक आहोत, असे काही जण म्हणू लागले आहेत. पण आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आमचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे. भाजपचे हिंदुत्व घरे जाळते आणि हमाला हिंदुत्व चूल पेटवते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

Aditya Thackeray | Eknath Shinde
Uddhav Thackeray : शिवसेनेची धुरा हातात आली अन् ठाकरे घरण्यातील पहिले 'CM' झाले

"ही निवडणूक निर्णायक आहे. जगण्याची आहे. सुड घेण्याची नाही, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, ही भाजप कुणालाही सोडत नाही, फक्त लुटण्याचे काम करते. भाजप दंगली भडकावत आहे. भाजपला किती दूर ठेवायचे हे तुम्हीच ठरवायचे आहे. आगामी काळात भाजपच्या अनेक टीम इथं प्रचारात उतरतील. हे लोक मारामारी लावून देण्यात माहीर आहेत", असाही हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.

ठाकरे शिवसेनेसाठी लढत प्रतिष्ठेची

भायखळ्यातील लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून मनोज जामसुतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांच्यात थेट लढत आहे. इथं मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे 10 मुस्लिम उमेदवारही रिंगणात आहेत. मुस्लिम मतांची विभागणी झाली तर व्यापारी वर्गाच्या मतदारांची भूमिका वाढणार आहे. अशा स्थितीत यामिनी जाधव यांच्या प्रचारात मारवाडी-गुजराती मतदारांना आकर्षित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. या समाजातील भाजपचे बडे नेतेही त्यांना साथ देत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com