Eknath Shinde at Gadchiroli: गडचिरोलीच्या पिपली बुर्गीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली ओवाळणी

Diwali Celebration : पालकमंत्री नसलो तरी दुर्लक्ष होऊ देणार नसल्याचा शब्द दिला
CM Eknath Shinde At Gadchiroli
CM Eknath Shinde At GadchiroliSarkarnama

CM in Naxal Affected Area : ‘पालकमंत्री असताना गडचिरोलीनं मला भरपूर प्रेम दिलं. गडचिरोलीत विषम परिस्थितीत पोलिस कसं काम करताहेत हे बघायला मिळालं. आता मी गडचिरोलीचा पालकमंत्री नसलो तरी मुख्यमंत्री म्हणुन माझी गडचिरोलीप्रती असलेली जबाबदारी आणखी वाढलीय. गडचिरोलीकडं कधीही दुर्लक्ष होऊ देणार नाही’, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिपली बुर्गीतील भगिनींना दिला.

मुख्यमंत्री शिंदे बुधवारी (ता. १५) गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. विविध वास्तुंचं लोकार्पण केल्यानंतर त्यांनी पिपली बुर्गी गावात आदिवासी व महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडुन भाऊबिजेची ओवाळणी स्वीकारली. त्यावेळी त्यांनी या स्नेहाची परफेड नक्की करू अशी ग्वाही दिली. (CM Eknath Shinde Celebrates Diwali at Pipli Burgi of Naxal Affected Gadchiroli District)

पिपली बुर्गीत तैनात असलेल्या प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या हातानं मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांना देण्यात येणारं कमांडो जॅकेट आणि कमांडो कॅप परिधान करीत शिंदे कार्यक्रमात सहभागी झालेत. आदिवासी बांधवांसोबत त्यांनी यावेळी दिवाळीही साजरी केली.

एटापल्ली पोलिस उपविभागअंतर्गत नव्यानं स्थापन झालेल्या पिपली बुर्गी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील विविध वास्तुंचं त्यांनी लोकार्पण केलं. यात पिपली चुनी येथील पोलिस ठाण्याचं भूमिपूजन, पोलिस अंमलदारांची बरॅक, अधिकारी विश्रामगृहाचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी यावेळी गडचिरोली पोलिस दल आणि सी-६० जवानांशी संवाद साधला. जिल्हा नक्षल प्रभावीत असल्यानं अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्या मुख्यमंत्र्यांनी जाणुन घेतल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अतिदुर्गम भागात गस्त घालता जवानांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. अशात संपर्काची साधनं, वाहनांची व्यवस्था, नक्षल चकमकीदरम्यान मिळणारी अतिरिक्त मदत, बिनतारी संदेश यंत्रणा, गडचिरोलीला पुरविण्यात आलेल्या हेलिकॉप्टरची स्थिती, शस्त्रास्त्र आदींची सखोल माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. नक्षलविरोधी अभियानात अलीकडच्या काळात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पथकातील जवानांशीही त्यांनी संवाद साधला.

गडचिरोलीतील दुर्गम भागांमधील आदिवासींना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पोलिस दादा लोरा खिडकीसारखे उपक्रम राबवित आहेत. त्यातून झालेल्या कामांचीही माहिती शिंदे यांनी घेतली. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीना, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या बटालियनचे समादेशक परविंदर सिंह, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, पोलिस उपअधीक्षक सुदर्शन राठोड, शिवराज लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

Edited by : Prasannaa Jakate

CM Eknath Shinde At Gadchiroli
Gadchiroli Congress : पालकमंत्री फडणवीस परत या, झेपत नसेल तर राजीनामा द्या

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com