Congress Politics : आधी निष्क्रिय आता कार्यक्षम; काँग्रेसच्या मिथिलेश कन्हेरेंबाबत नेमकं काय घडलं?

Mithilesh Kanhere : लोकसभेच्या निवडणुकीत नेमून दिलेले काम केले नाही, असे सांगून विदर्भातील युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्या होत्या.
Mithilesh Kanhere
Mithilesh KanhereSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत, हे काही लपून राहिलेले नाही. या गटबाजीचा फटकाही पक्षाला वारंवार सहन करावा लागला आहे. लोकसभा निवडणुकीत नागपूर ग्रामीण युवक काँग्रेसच्या अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेऊन बडतर्फ करण्यात आले होते. आता त्यांनी उत्कृष्ट काम केल्याच्या साक्षात्कार पक्षाला झाला असून त्यांना पुन्हा अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत नेमून दिलेले काम केले नाही, असे सांगून विदर्भातील युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. राहुल गांधी यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन फॉर्म भरण्यास सांगितले होते. फॉर्ममध्ये अनेक प्रश्न होते. त्याची उत्तर नागरिकांकडून घेऊन वरिष्ठांकडे सादर करायची होती. यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार होता. तर काँग्रेसच्या जाहिरनामाही यावरच अवलंबून होता.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच Lok Sabha घोषणा झाली. पूर्व विदर्भात पहिल्याच टप्प्यात मतदान घेण्यात आले. त्यामुळे अनेक कार्यकर्ते प्रचारात व्यस्त झाले होते. लोकसभेची निवडणूक आटोपताच पक्ष कार्यात निष्क्रिय व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेऊन विदर्भातील अनेक पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कन्हेरे यांना थेट बडतर्फ करण्यात आले होते. यावरून युवक काँग्रेसमधील वातावरण चांगलेच तापले होते.

Mithilesh Kanhere
Beed Firing Case Update : आंधळे खूनप्रकरणात 4 जणांना अटक; बबन गित्तेच्या शोधासाठी चार पथकं

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत Kunal Raut यांच्या सांगण्यावरून कारणे दाखवा नोटीस पाठवल्याची चर्चा त्यावेळी झाली. याविरोधात अनेकांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासन बी. व्ही. यांच्या कानावर महाराष्ट्रातील प्रकार घालण्यात आला होता. युवक काँग्रेसमध्ये निर्माण झालेला असंतोष बघून त्यांनी याची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

मिथिलेश कन्हेरे यांच्या तक्रारीची दखल घेत श्रीनिवास बी. व्ही. चौकशी केली. यात त्यांना कन्हेरे हे संपूर्ण लोकसभा निवडणुकीत सक्रिय असल्याचे दिसून आले. माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात त्यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रात उत्तम कार्य केले. त्यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रातील प्रचार यंत्रणा उत्तम हाताळली व बूथचे योग्य नियोजन केले. त्यामुळे हिंगणा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्याचे समोर आले.

आता या सर्व बाबींचा विचार करून युवक काँग्रेसच्या वरिष्ठांनी मिथिलेश कन्हेरे यांची बडतर्फी रद्द करून तत्काळ जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार घेण्याचे पत्र जारी केले. काँग्रेसमधील ही कुरघोडी मात्र विदर्भासह राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Mithilesh Kanhere
Video Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, 'दोन वर्षात एक लाख...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com