Nagpur Congress Politics : काँग्रेसने बालेकिल्ल्यातील पराभवाचे खापर फोडले एका नेत्यावर; दिल्लीत पोहचली फाईल...

Nagpur Rural Congress Politics Sunil Kedar : काँग्रेसने सुनील केदारांना यासाठी जबाबदार धरले असून तसा अहवालही पक्षश्रेष्ठींकडे सादर केला असल्याचे समजते.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : रामटेक लोकसभा जिंकल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा साफ झाला. विशेष म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना एकहाती निवडणूक जिंकून देणाऱ्या माजी मंत्री सुनील केदारांना त्यांचा सावनेर विधानसभा मतदारसंघही राखता आला नाही. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एवढे परिवर्तन कसे काय झाले, याचा शोध घेतला जात आहे.

काँग्रेसने केदारांना यासाठी जबाबदार धरले असून तसा अहवालही पक्षश्रेष्ठींकडे सादर केला असल्याचे समजते. मात्र, या अहवालावर एकही नेता प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत केदारांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी यांना उमेदवारी जाहीर केली होती. यासाठी त्यांनी फक्त बर्वे यांच्याच नावाचा ठराव करण्यासाठी काँग्रेस कमेटीवर दबाव टाकला होता. त्यांनी बर्वे यांच्या विजयाची हमी घेतली होती.

Congress
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला मोक्का लावताच सुरेश धस आक्रमक; म्हणाले, आता कुणालाही सोडणार नाही!

दिल्लीतील नेत्यांनीही फारसे लुडबूड करण्याचे टाळले होते. त्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे  रश्मी बर्वे यांच्याऐवजी श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली. ते विजयीसुद्धा झाले. त्यानंतर केदारांचा वारू चौफेर उधळू लागला. त्यांनी अनेकांना खुले आव्हान देणे सुरू केले. मीच सर्व सहा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरवतो असे सांगणे सुरू केले.

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा त्यांनी कोणाला घेऊ दिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे सेना आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्यांनी हस्तक्षेप सुरू केला. हिंगणा आणि रामेटक विधानसभा मतदारसंघ सोडावा यासाठी दबाव टाकला होता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर राखणे सुरू केले.

Congress
Local Body Elections : राऊत यांच्या घोषणेनं शिवसैनिकांची धाकधूक वाढली? नागपुरात शिवसैनिक सैरभर

हिंगणा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असताना त्यांनी आपला उमेदवार लादणे सुरू केले. रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांना माघार घेण्यासाठी दबाव टाकला होता. रामटेक विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सेना उमेदवाराच्या विरोधात उघड भूमिका घेतली. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचा प्रचार केला.

उमरेडमध्येही त्यांनी अनेकांना उमेदवारी मिळवून देण्याचा शब्द दिला होता. केदारांचा वाढता हस्तक्षेप, नेत्यांना डावलणे, परस्पर निर्णय घेणे आणि मी म्हणेल ती पूर्व दिशा हे त्यांचे धोरण कार्यकर्त्यांना आवडले नाही. यामुळे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. असा अहवाल काँग्रेसने सादर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com