Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला मोक्का लावताच सुरेश धस आक्रमक; म्हणाले, आता कुणालाही सोडणार नाही!

Suresh Dhad Reaction Santosh Deshmukh Murder Case : खंडणीप्रकरणा वाल्मिक कराडला केज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Walmik Karad, Suresh Dhas
Walmik Karad, Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Beed News : खंडणीप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला केज कोर्टाने मंगळवारी सीआयडी कोठडीची मागणी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, त्यानंतर लगेचच विशेष तपास पथकाने कराडवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. मागील अनेक दिवसांपासून आमदार सुरेश धस यांच्यासह संतोष देशमुख कुटुंबियांकडूनही ही मागणी केली जात होती. आता पोलिसांनी मोठं पाऊल उचलल्यानंतर त्यावर धस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली कराडवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कराडला मोक्का लावताच धस यांनी प्रतिक्रिया देताना आता कुणालाही सोडणार नाही, असे म्हटले आहे. ते म्हणाले, कोणत्या गुन्ह्याखाली त्यांना (कराडला) घेतलंय हे मला माहिती नाही. पण आता कुणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील, ते या कायद्याच्या अंतर्गत येतील.

Walmik Karad, Suresh Dhas
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडला 'मोक्का', काही क्षणात परळीची बाजारपेठ बंद; टायर जाळले, समर्थक टाॅवरवर अन्...

पोलिस यंत्रणा आहे. आम्ही कुणी बोलून काही होत नाही. एसआयटी प्रभावीपणे काम करत आहे. त्यांनी नियमाप्रमाणे कडी सोडली असेल, पोलिसांच्या कडीमध्ये जेजे लोक सापडतील, तेते त्यामध्ये येतील. तिथे आज काय घडलं ते मला माहिती नाही. एसआयटीने अर्ज केलाय एवढंच कळलं आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नसतो, हे निश्चित असल्याचे धस यांनी सांगितले.

एसआयटीचा कोर्टात अर्ज

एसआयटीने कराडला मोक्काच्या कचाट्यात आणले आहे. याअंतर्गत सीआयडीकडून कराडचा ताबा मिळावा, यासाठी एसआयटीने केज कोर्टात अर्ज दाखल केला आहे. एसआयटीने पोलिस कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे कराडच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

Walmik Karad, Suresh Dhas
Nana Patole News : बीड, परभणी प्रकरण सरकार पुरस्कृत; सगळी माहिती असताना चौकशीचे नाटक कशाला!

जामीनासाठी अर्ज

कराडच्या वतीने खंडणीच्या प्रकरणात जामीन मिळावा, यासाठी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. आजच कोर्टानो सीआयडीची कोठडीची मागणी फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कराडच्या वतीने तातडीने जामीनासाठी अर्ज केला आहे. आता कोर्ट कराडचा ताबा एसआयटीला देणार का, हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com