NagarPalika Nivadnuk : निवडणुकीत पैशांचा धूर, तरी एका मताने भाजपचा गेम फसला... काँग्रेस उमेदवारावर पडला गुलाल

Gadchiroli municipal election : राज्यभर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा सुरू आहे.
Gadchiroli municipal election
Gadchiroli municipal electionsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांनी केवळ एका मताने विजय मिळवला.

  2. निवडणुकीदरम्यान भाजपकडून मोठ्या प्रमाणात खर्च केल्याचे आरोप विरोधकांनी केले होते.

  3. या निकालामुळे एका मताचे महत्त्व किती निर्णायक असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Gadchiroli News : एका मतासाठी पाच हजार तर कुठे पन्नास हजार रुपये भाजपने खर्च केल्याचा आरोप नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांनी केला होता. मात्र एका मतामुळे काय फराक पडतो हे गडचिरोली नगर परिषदेची निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसच्या एका उमेदवाराने दाखवून दिले आणि भाजपचेच गणित बिघडवले. काँग्रेसच्या श्रीकांत देशमुख यांनी केवळ एक मत जास्तीचे घेऊन विजय मिळवला.

श्रीकांत देशमुख यांनी गडचिरोली नगर परीषदेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७१७ मते मिळवून भाजपच्या संजय मांडवगडे यांच्यावर एका मताने विजय मिळवला आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवार (ता. २१) जाहीर झाला असून जिल्ह्यातील तिन्ही नगर परीषदांवर भाजपचे कमळ पुन्हा एकदा फुलले आहे.

मात्र, याच वेळी गडचिरोलीतील एका रोमहर्षक लढतीकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले. प्रभाग क्रमांक ४ मधील काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या संजय मांडवगडे यांच्यावर अवघ्या एका मताने मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला. 'एका मताची किंमत काय असते' हे यातून अनेकांना कळले.

Gadchiroli municipal election
Mahayuti municipal elections: शेकडो नेते आयात करूनही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची दमछाक : महापालिका, ZP साठी प्लॅन बदलणार?

काँग्रेसचे श्रीकांत देशमुख आणि भाजपचे संजय मांडवगडे यांच्यात प्रत्येक मतासाठी अटीतटीची लढत सुरू होती. जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण होत गेल्या, तशी उत्कंठा शिगेला पोहोचली. अखेर जेव्हा अंतिम आकडेवारी समोर आली, तेव्हा अवघ्या एका मताचा फरक पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

या लढतीत श्रीकांत देशमुख यांना ७१७ मते मिळाली, तर संजय मांडवगडे यांना ७१६ मिळाली. पराभूत उमेदवार मांडवगडे यांनी निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत निकाल जाहीर केला.

Gadchiroli municipal election
Naldurg municipal election: नळदुर्ग नगरपालिकेतील निकालाने काळजाचा ठोका चुकला! अवघ्या एका मताने बाजीच पलटवली

FAQs :

1. गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत कोण विजयी झाले?
काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख विजयी झाले.

2. विजयाचा फरक किती मतांचा होता?
केवळ एका मताचा फरक होता.

3. निवडणुकीत कोणते आरोप झाले होते?
भाजपकडून एका मतासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केल्याचे आरोप झाले होते.

4. हा निकाल चर्चेत का आला?
अत्यंत कमी फरकाने निकाल लागल्यामुळे आणि एका मताने सत्ता बदलल्यामुळे हा निकाल चर्चेत आला.

5. या निकालाचा राजकीय अर्थ काय आहे?
प्रत्येक मताचे महत्त्व किती मोठे असते, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com