Congress City President : मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कॉंग्रेसच्या माजी शहरअध्यक्षांना ‘या’ प्रकरणात अटक !

Sheikh Hussain : हुसेन यांना दुसऱ्या एका प्रकरणात अटक झाली आहे.
Sheikh Hussain, Congress
Sheikh Hussain, CongressSarkarnama

Nagpur Congress City President's News : काही महिन्यांपूर्वी एका आंदोलनादरम्यान कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. तेव्हा वातावरण चांगलेच तापले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता हुसेन यांना दुसऱ्या एका प्रकरणात अटक झाली आहे. (Abusive words were used about Narendra Modi)

उमरेड मार्गावरील मोठा ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये एक कोटी ५९ लाख ५२ हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार (वय ६८, रा. मस्कासाथ, जागनाथ बुधवारी) यांच्यासह माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी यांना काल (ता. ७ मे) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

पोलिसांनी त्यांची तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळविली. या प्रकरणात सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेख हुसेन हे १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ट्रस्टचे अध्यक्ष होते. पदावर असताना दोघांनी ऑडिट न करता पाच वर्षांत एक कोटी ५९ हजार रुपयांचा अपहार केला. या दोघांचा कालावधी संपल्यानंतर ताज अहमद अली अहमद सय्यद (वय ५४, रा. निराला सोसायटी, मोठा ताजबाग) यांनी सचिव पदाचा पदभार स्वीकारला.

ताज अहमद अली अहमद सय्यद यांनी ऑडिट करवून घेतले असता त्यात दीड कोटी रुपयांची हेराफेरी असल्याची माहिती समोर आली. त्यातून २२ सप्टेंबर २०२२ ला त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा घोटाळा समोर आला. सय्यद यांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शेख हुसेन व माजी सचिव इक्बाल इस्माईल वेलजी या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

Sheikh Hussain, Congress
Nagpur Refinery : पेट्रोकेमिकल रिफायनरीला बारसूत विरोध, पण नागपुरात होण्याची शक्यता !

विशेष म्हणजे, शेख हुसेन व वेलजी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तोही फेटाळल्यानंतर त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज ते सादर होताच, त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत सत्र न्यायालयातून बुधवारपर्यंत पोलिस कोठडी मिळविली.

Sheikh Hussain, Congress
Nagpur District APMC Analysis : सहकारात कॉंग्रेसचा दबदबा कायम, भाजपला आणखी एक संधी !

पंतप्रधान मोदींवरही केली होती टिका..

शेख हुसेन यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात (Prime Minister) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी सदर पोलिस (Police) ठाण्यात निवेदन सादर करीत, अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ताजबाग ट्रस्टमध्ये घोटाळ्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com