Congress Politics : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आता 'पॉवरफुल'! एआयसीसीसोबत थेट संपर्क राहणार

Congress Politics District Presidents : काँग्रसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह नऊ राज्यांमधील सर्व जिल्हा व शहराध्यक्षांची बैठक गुरुवारी दिल्ली झाली.
Congress
Congresssarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसचा सातत्याने होत असलेला पराभव, विधानसभेत घटत चाललेले प्रतिनिधित्व सोबतच संघटनात्मक ताकदही कमी होत चालली असल्याने केंद्रीय नेतृत्वाने याची आता गंभीर दखल घेतली आहे. पक्षांतर्गत गटबाजी, निष्क्रिय पदाधिकारी, शिफारसीने होणाऱ्या नियुक्त्या हेसुद्धा यास कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून आता जिल्हाध्यक्षांना पॉवरफुल करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

त्यानुसार जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचे स्वतंत्र संबंधित अध्यक्षांना दिले जाणार आहे. सोबतच पक्षाच्या कार्यक्रमांना, बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्यांची व कार्यकर्त्यांना रोखण्याऱ्या नेत्यांवरही नजर ठेवली जाणार असून अध्यक्ष आता राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत थेट संपर्कात राहणार आहे.

काँग्रसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, महासचिव वेणुगोपाल, राष्ट्रीय महासचिव मुकल वासनिक यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह नऊ राज्यांमधील सर्व जिल्हा व शहराध्यक्षांची बैठक गुरुवारी दिल्ली येथे इंदिरा भवन येथे बोलावण्यात आली होती. या सर्वांना यापुढे काँग्रेसची वाटचाल आणि बांधणी कशी राहणार याची माहिती देण्यात आली. जिल्हाध्यक्षांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.

Congress
Suresh Dhas interview : पत्रकार विलास बडेंबद्दल केलेलं वक्तव्य अनावधानाने; सुरेश धस यांचं घुमजाव

काँग्रेसमधील गटबाजीवर सर्वाधिक तक्रारी आल्या. मोठमोठे नेते व पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्याला थेट मोठमोठी पदे देतात त्यांना कार्यकारिणीमध्ये घेतात अशी नाराजही अनेकांनी व्यक्त केली. त्याची दखल घेत जिल्हाध्यक्षांना कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार देण्यात आले. सोबतच विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणून त्यांची फळी तयार केली जाणार आहे.

शहर, जिल्हा, ग्रामीण, तालुका, गावनिहाय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. बुथ बळकट केले जाणार आहे. प्रत्येक बुथवर 10 कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. मतदार याद्यांपासून भविष्यातील निवडणुकीचे बारिकसारिक नियोजन करण्यात येणार आहे. तशा स्पष्ट सूचना जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली होती. त्यांना निलंबित करून बाबा आष्टनकर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर काँग्रेसच्या एका बैठकीत निलंबित अध्यक्षांना बोलावण यात आले होते. बोलावणे सोडाच मिटिंग कल्पानुसद्धा आष्टनकर यांना देण्यात आली नव्हती.

नागपूर शहरात काँग्रेसचा एक गटाच्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षांपासून काँग्रेसचे देवडिया भवन येथील कार्यालयाची पायरीसुद्धा चढली नाही. यापैकी अनेकांचा शहर आणि राज्य कार्यकारिणीत समावेश आहे. माजी प्रदेशाध्यक्षाने पक्षाशी संबध नसताना आपल्या एका कार्यकर्त्याची थेट प्रदेश कार्याकारिणीत नेमणूक केली होती.

Congress
Shahajibapu Patil : शहाजीबापूंनी भरसभेत स्टेजवरच स्वतःच्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या, म्हणाले ‘कशासाठी आपण हे पाप केलं...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com