

घुग्घुस नगरपालिकेत काँग्रेसमध्ये उघड फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहा काँग्रेस नगरसेवकांनी पक्ष सोडत अपक्षांसह स्वतंत्र गट स्थापन केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी ही मोठी राजकीय अडचण ठरत आहे.
Chandrapur News : नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये एकजुटीने दमदार यश मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगू लागले आहे. त्याचेच पडसाद आता ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घुग्घुस नगरपालिकेत उमटले आहे. काँग्रेसमध्ये उघड फूट पडल्याचे चित्र आहे. एकूण १४ नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडत अपक्ष नगरसेवकांसोबत आठ जणांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे.
घुग्घुस नगर पालिकेच्या पहिल्याच नगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. मात्र, उपाध्यक्ष आणि सभापती पदाच्या नियुक्तीवरून पक्षात तीव्र मतभेद उफाळून आले. भाजप नेत्यांशी संबंधित आणि कोळसा वाहतूक व्यवसायात सक्रिय असलेल्या एका व्यक्तीला उपाध्यक्षपद देण्याच्या प्रयत्नातूनच हा वाद चिघळल्याचे सांगितले जाते.
ही व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून निवडून आली असून, तिचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याशी निकटचे संबंध आहेत. अशा व्यक्तीला उपाध्यक्षपदी बसवण्यास काँग्रेसचे स्थानिक नेते राजू रेड्डी यांनी तीव्र विरोध दर्शविला. या विरोधातूनच काँग्रेसमध्ये अंतर्गत लाथाळ्या सुरू झाल्या आणि अखेर पक्षात फूट पडली.
काँग्रेसचे नगरसेवक रोशन पचारे, अर्चना सारोवकर, दिलीप पिट्टलवार, वैशाली चिकणकर, सुरज कन्नूर आणि श्रुतिका कलवल यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पत्र देत स्वेच्छेने काँग्रेस गटातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. या सहाही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या पत्रावर आहेत.
विशेष म्हणजे, ज्याला उपाध्यक्षपदी नेमण्याचा आग्रह धरला जात आहे तो व्यक्ती कोळसा वाहतूक व्यवसायात सक्रिय असून, वारंवार राजकीय निष्ठा बदलणारा म्हणून ओळखला जातो. तो भाजपच्या जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याच्या ‘फ्रेंड्स क्लब’चा अध्यक्ष असल्याचीही चर्चा आहे. या अशा पार्श्वभूमीवर भाजपशी संबंधित व्यक्तीसाठी काँग्रेसमधील काही नेते आग्रही का आहेत, हा चर्चेचा विषय ठरला आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून झालेल्या अंतर्गत संघर्षानंतर आता घुग्घुस नगरपालिकेत उपाध्यक्षपदासाठी नेत्यांच्या मर्जीचा वाद उफाळून आला आहे. त्यातूनच काँग्रेसमध्ये फूट पडून आठ नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रेड्डीनाच सर्वच हव...
संख्याबळ बघता काँग्रेसचे दोन नगरसेवक स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत जावू शकतात. मात्र, यातील भाजपशी संबंधित एका व्यक्तीला राजू रेड्डी यांनी पसंती दर्शविली, असे सांगितले जात आहे. याशिवाय रेड्डी शहर अध्यक्ष आहे.पालिकेत गटनेते झाले. उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती पद सुद्धा त्यांना हवे आहे. एकाच व्यक्तीला सर्व पदे दिल्यास इतरांचे काय, यामुळेच पक्षांच्या काही नगरसेवकांनी वेगळा मार्ग निवडल्याचे सांगितले जात आहे.
1. घुग्घुस नगरपालिकेत काँग्रेसमध्ये फूट का पडली?
→ श्रेयवादाचे राजकारण आणि अंतर्गत मतभेद यामुळे फूट पडली आहे.
2. किती नगरसेवकांनी काँग्रेस सोडली आहे?
→ एकूण सहा नगरसेवकांनी काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.
3. नवीन गटात किती नगरसेवक आहेत?
→ अपक्षांसह एकूण आठ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन झाला आहे.
4. याचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
→ काँग्रेसचे मतांचे विभाजन होऊन पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे.
5. घुग्घुस नगरपालिकेत एकूण किती नगरसेवक आहेत?
→ घुग्घुस नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.