Congress leader attack : धक्कादायक! जुन्या वैमनस्यातून काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला; अकोटमध्ये खळबळ

akot political violence news : अकोटमध्ये जुन्या वैमनस्यातून काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपास सुरू.
Congress leader attack : धक्कादायक! जुन्या वैमनस्यातून काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला; अकोटमध्ये खळबळ
Published on
Updated on

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना अकोट येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

लोकसभा २०१९च्या निवडणुकीदरम्यान मोहाळा येथे भाजप अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीनखाँ शेरखाँ पटेल (वय ४८) यांची हत्या झाली होती. या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अद्यापही न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. हिदायत पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी या प्रकरणाला जोडले जात आहे.

Congress leader attack : धक्कादायक! जुन्या वैमनस्यातून काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला; अकोटमध्ये खळबळ
Devendra Fadnavis : CM फडणवीस पुण्यात आले अन् निवडणूक फिरवून गेले? भाजपच्या 125+ साठी तासाभरात लावली फिल्डिंग

मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजता हिदायत पटेल नमाज पठणासाठी मोहाळा येथील जामा मस्जिदमध्ये गेले होते. नमाज पठणानंतर बाहेर पडत असताना काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला चढविल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात त्यांना दुखापत झाली असून घटनास्थळाजवळील नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच अकोट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोहाळ्यासह अकोट शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेबाबत चर्चा रंगल्या असून काही भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही अकोट येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Congress leader attack : धक्कादायक! जुन्या वैमनस्यातून काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला; अकोटमध्ये खळबळ
PCMC Election : पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' 14 प्रभागांमध्ये 'हायव्होल्टेज' लढती... CM फडणवीस अन् अजितदादांची एकमेकांना 'टफ फाईट'

२०१९ च्या हत्याकांडानंतर परिसरात दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे मानले जाते. त्यामुळे आज झालेल्या हल्ल्याला जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आदींच्या आधारे तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातही हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com