
Congress to Launch Farmers’ Movement from Dabhadi : पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती. दाभडी गावातील शेतकऱ्यांसोबत 'चाय पे चर्चा' करून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक नफा देऊ आणि देशात कृषी क्रांती घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. आज अकरा वर्षांपासून ते पंतप्रधान आहेत. यापैकी एकाही आश्वसनांची पूर्ती केली नाही. असा आरोप करत याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्यावतीने येत्या ३ जून रोजी याच गावातून शेतकरी आत्मसन्मान यात्रा काढण्याचे ठरवण्यात आले आहे.
दाभडी गावातून शेतकरी आत्मसन्मान यात्रा काढून आर्णी तालुक्यात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन उभारणार आहेत. विदर्भातील काँग्रेसचे खासदार, आमदार, कार्यकर्ते आणि शेतकरी यात सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आज नागपूरमध्ये जाहीर केले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, शेतमालाला हमी भाव द्यावा, सरसकट पिक विमा योजना राबबावी, शेतील मोफत वीज आणि वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी कुंपणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यातून केल्या जाणार आहेत.
तसेच २० मार्च २०१६ रोजी मोदी या ठिकाणी चाय पे चर्चा कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना भरमसाठ आश्वासनं दिली होती. त्यांच्यावर भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला होता. मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची अवस्था मरणाहून वाईट अशी झाली आहे. आत्महत्या थांबण्याऐवजी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ऐवजी विदेशातून धान्य, तेल आयात करून शेतमालाचे भाव पाडल्या जात असल्याचा आरोप मोघे यांनी यावेळी केला.
दिल्लीत शेतकऱ्यांनी लाखोच्या संख्येन आंदोलन केले होते. त्यात ७१९ शेतकऱ्यांनी बलिदान दिले. त्यानंतर तीन शेतकरी विरोधी काळे कायदे केंद्र सरकारला परत घ्यावे लागले. आंदोलनाशिवाय या सरकारला जाग येत नाही. मोदी यांना त्यांनीच दिलेल्या आश्वासनांचे स्मरण करून देण्यासाठी आंदोलन पुकरण्यात आले असल्याचे मोघे यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे नेते गिरीश पांडव उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.