Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या विरोधकाला काँग्रेसनं दिलं बळ

Vidhansabha Election Congress Campaign : काँग्रेसने त्यांची थेट राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त केली आहे. हरियाणाचे निवडणूक प्रभारी म्हणूनही जबाबदारी सोपवून त्यांचे हात आणखीच बळकट केले आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून कोण लढणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. भाजपही काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारावर बाराईकने लक्ष ठेवून आहे. माजी नगरसेवक प्रफुल गुडधे यांचे नाव यात सर्वाधिक आघाडीवर आहे. त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असतानाच काँग्रेसने त्यांची थेट राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त केली आहे. हरियाणाचे निवडणूक प्रभारी म्हणूनही जबाबदारी सोपवून त्यांचे हात आणखीच बळकट केले आहे.

मोदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत शीतयुद्ध थांबले असल्याचे दिसत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कोणी कोणाच्या विराधात प्रचार केल्याचे आढळले नाही. एकमेकांच्या विरोधात तक्रारीसुद्धा केल्या नाहीत. याचा परिणामही निवडणूक निकालात दिसून आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या हेविवेट उमेदवाराच्या विरोधात लढणारे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे (Vikas Thackeray) यांनी लक्षणीय मते घेतली. गडकरी यांचे मताधिक्य दीड लाखाने घटवले.

Devendra Fadnavis
Sonam Wangchuk : दिल्ली चलो पदयात्रा, लडाखसह कारगिलसाठी मोठी मागणी

महाविकास आघाडीची एकजूट बघून निवडणूक प्रचारा दरम्यान भाजपाची धाकधूक वाढली होती. नागपूर मधून गडकरी (Nitin Gadkari) नसते तर भाजप पराभूत झाली असती असेच राजकीय चित्र सध्या नागपूरमध्ये आहे. आता महाविकास आघाडीने सर्व लक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रीत केले आहे. त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केला जात आहे. काँग्रेसने प्रफुल गुडधे यांना जवळपास हिरवा कंदिल दाखवल्याचे समजते. त्यांनी निवडणूक याद्यांपासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. घरोघरी दौरे ते करीत आहेत. भाजप विरोधातील असंतोष कॅश करीत आहेत. कधी नव्हे गुडधे यांचा वाढदिवसही यावेळी दणक्यात साजरा करण्यात आला.

Devendra Fadnavis
Mahayuti Seat Allotment : महायुतीच्या जागावाटपाबाबत बावनकुळेंचे मोठे विधान; 176 जागांवर एकमत, मतभेद असणाऱ्या 112 जागा कोणत्या?

आता त्यांना राष्ट्रीय सचिव केल्याने त्यांच्या कार्यालयात गर्दी वाढली आहे. दक्षिण-पश्चिमचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जवळपास काँग्रेसने (Congress) निश्चित केले असल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांच्याकडे हरियाणा राज्याची निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. येत्या एक दीड महिन्यात महाराष्ट्राची निवडणूक घोषित होणार आहे. हरियाणा निवडणुकीचा अनुभव गुडधे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढताना कामी येणार आहे. राष्ट्रीय सचिव झाल्याने विधानसभेच्या निवडणुकीत गुडधे यांच्या विरोधात कारवाया करणार्‍यांनासुद्धा आता हजार वेळा विचार करावा लागणार आहे. नागपूरचे मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे अनेक वर्षांपासून दिल्लीत आहेत. हे दोघेही राष्ट्रीय महासचिव आहेत. मुन्ना ओझा गुजरातचे प्रभारी आहेत. आता त्यांच्या पंक्तीत गुडधे यांना बसवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com