Vijay Wadettiwar : बच्चू कडू हा गुलाम बनणारा नव्हे, तर मर्द माणूस, पण…

Navneet Rana : बोगस सर्टिफिकेटवाल्यांना मार्गदर्शक ठेवत असतील, तर पुढच्या पिढीच काय होईल? सगळेच आपले सर्टिफिकेट बदलवा…
Vijay Wadettiwar, Navneet Rana & Bacchu Kadu
Vijay Wadettiwar, Navneet Rana & Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar : मागील काही दिवसांपासून प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू भारतीय जनता पक्षाच्या नावाने खडे फोडत आहेत. भाजप ‘यूज ॲन्ड थ्रो’ पक्ष आहे, या महादेव जानकर यांच्या सुरात त्यांनी सूर मिसळला होता. पण तरीही ते महायुतीसोबत आहेत. याचा समाचार घेताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बच्चू कडू यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

मंगळवारी (ता. 4) नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, बच्चू कडूंनी कुठे जायचं, काय करायचं, हा त्यांचा विषय आहे. महाविकास आघाडीत होते, तेव्हा त्यांना मंत्रिपद होते, आता ते गमावून बँकेचा अध्यक्ष होण्यावर त्यांना समाधान मानावं लागलं. बच्चू कडूंना भाजपने सोबत घेतले. पण तेथे गुलाम बनण्याची त्यांची इच्छा असेल तर माहिती नाही. पण बच्चू कडू हा गुलाम बनणारा माणूस नाही, तर हा मर्द माणूस आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar, Navneet Rana & Bacchu Kadu
Vijay Wadettiwar : ‘त्यांची’ ‘गॅरंटी’ काय? वडेट्टीवारांचा मोदींना टोला!

माचीस की एक तिली आग लगा सकती है..

भाजपमध्ये बच्चू कडूंची मानसिकता गुलामीची झाली असेल तर त्यांना कोण रोखणार आहे? त्यांनी खुशाल जावं, काँग्रेसचे काय ते आम्ही बघून घेऊ. काँग्रेस कशी राहणार, हे लोकांच्या मतदानातून मतपेटीतून दिसून येईल. आज त्यांना सगळं काही हिरवं हिरवं दिसत असेल. मात्र ते हिरवं कालांतराने पिवळं होत असतं आणि पिवळं झाल्यावर ते वाळत असतं. हळूहळू रूप रंग सर्व बदलत असतं आणि शेवटी ते इतकं पिवळं पडतं की शेवटी ‘माचीस की एक तिली आग लगा सकती है और राख बना सकती है’, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

बोगस सर्टीफिकेटवाल्यांना बोलवत असाल तर..

बोगस सर्टिफिकेटवाल्यांना जर युवांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवत असतील, तर युवा पुढे कुठे जाईल. सगळेच आपले सर्टिफिकेट बदला आणि त्या संमेलनाला जा म्हणजे तुम्हाला कुठेही वावरता येईल. कुठल्याही कॅटेगिरीत तुम्हाला उभे राहता येईल, हा संदेश त्या सभेतून मिळणार आहे. जात व सर्टिफिकेट बदलवून फायदा घ्या, रोजगार वगैरे काही नको, काम नको हाताला, फक्त सर्टिफिकेट हा चांगला संदेश आहे, असे म्हणत वडेट्टीवारांनी खासदार नवनीत राणा यांना जोरदार टोला हाणला.

Vijay Wadettiwar, Navneet Rana & Bacchu Kadu
Vijay Wadettiwar : तुटपुंज्या रकमेऐवजी शेतकऱ्यांना भरघोस मदत करीत पाठबळ द्या

त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर राहिली नाही..

अजित पवारांबाबत बोलताना त्यांच्याकडे आता बार्गेनिंग पॉवर राहिलेली नाही. भाजपच्या खुंटीला ते बांधले गेले आहेत. जे ते देतील, तेच ते खातील. त्यांच्या दयेवर जगणारे हे निशाचर प्राणी झाले आहेत, असे म्हणत वडेट्टीवारांनी अजित पवारांची खिल्ली उडवली. पुरोगामी विचाराचे लोक सोबत राहावे, असे आमचे प्रयत्न आहेत. आम्ही तडजोडीला तयार आहोत. त्यांनी थोडी तडजोड करावी. पवार साहेबांनी सांगितलं आहे की, आम्ही चार-पाच जागांवर मदत करू शकतो. तिन्ही लोकांनी बसून प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या-त्यांच्या कोट्यातील जागा द्याव्या, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar, Navneet Rana & Bacchu Kadu
Vijay Wadettiwar vs Ajit Pawar: पुरवणी मागण्यांवरून वडेट्टीवारांचा अजितदादांवर घणाघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com