Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदींचा बाप काढला; मुत्तेमवार अडचणीत येणार? भाजपची काय आहे मागणी?

Vilas Muttemwar काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Chandrashekhar Bawankule, Vilas Muttemwar
Chandrashekhar Bawankule, Vilas Muttemwarsarkarnama

Nagpur News : काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी नरेंद्र मोदी यांचा बाप काढला आहे. अत्यंत खालच्या स्तराच्या भाषेचा त्यांनी वापर केलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाने विलास मुत्तेमवार यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना दिले आहे. आम्हाला अपेक्षा आहे, की विलास मुत्तेमवार यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदी अहंकारी असल्याचे सांगून त्यांनी मोदींवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. तसेच नितीन गडकरी हे पाच लाख मतांनी निवडून येणार म्हणतात पण, त्यांना गल्लोगल्ली फिरावे लागतंय, अशी टीका त्यांनी केली आहे.

यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मुत्तेमवार यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदन दिले. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत निवेदन देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते. या वेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrashekhar Bawankule, Vilas Muttemwar
Nagpur Lok Sabha 2024 : नागपुरातील 108 माजी नगरसेवकांवर भाजपचा ‘वॉच’; लोकसभेतील लीडवरच ठरणार पालिकेचे तिकीट

बावनकुळे म्हणाले, काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यांनी मोदींचा बाप काढला आहे. त्यामुळे आम्ही मुत्तेमवार यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणून आज निवेदन दिले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, विलास मुत्तेमवार यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करेल.

काँग्रेसने आपल्या अधिकृत पेजवर मी स्वत: दीक्षाभूमीत बोलतोय असा एक व्हिडिओ टाकला आहे. जात धर्म पंथाच्या नावावर मत मागणारा हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत पेजवर आला आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार यांनी कलम 123 चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. तसेच आम्ही निवडणूक आयोगाकडेही अशीच मागणी केली आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Chandrashekhar Bawankule, Vilas Muttemwar
Nagpur Lok Sabha Election : नागपुरात गडकरी-ठाकरे थेट लढत, फायदा कुणाला ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com