Nagpur Lok Sabha 2024 : नागपुरातील 108 माजी नगरसेवकांवर भाजपचा ‘वॉच’; लोकसभेतील लीडवरच ठरणार पालिकेचे तिकीट

BJP News : भाजपच्या पाठीशी प्रचंड मोठी यंत्रणा आहे. तसेच, नागपूर महापालिकेत निवडून आलेल्या 108 माजी नगरसेवकांचेही पाठबळ गडकरींकडे आहे. मात्र, या नगरसेवकांच्या हालचालींवर भाजपची बारीक नजर आहे. हे नगरसेवक कोणाला भेटतात, कसा प्रचार करतात, याची देखरेख केली जात आहे.
Nagpur Lok Sabha 2024
Nagpur Lok Sabha 2024Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 05 April : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमधून पुन्हा एकदा लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांना पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. भाजपच्या पाठीशी प्रचंड मोठी यंत्रणा आहे. तसेच, नागपूर महापालिकेत निवडून आलेल्या १०८ माजी नगरसेवकांचेही पाठबळ गडकरींकडे आहे. मात्र, या नगरसेवकांच्या हालचालींवर भाजपची बारीक नजर आहे. हे नगरसेवक कोणाला भेटतात, कसा प्रचार करतात, याची देखरेख केली जात आहे.

दरम्यान, नागपूर महापालिकेची निवडणूक लोकसभेनंतर होणार आहे, त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून, वॉर्डातून कोणाला किती मताधिक्य मिळते, यावरच नगरसेवक पदाचे तिकीट अवलंबून असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांचे भवितव्य नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना कोणी किती लीड दिले यावरच असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagpur Lok Sabha 2024
Dhule Lok Sabha Constituency : भाजप लागला प्रचाराला; पण काँग्रेसला उमेदवारच मिळेना...!

नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipality) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे एकूण १०८ नगरसेवक निवडून आले हेाते, तर काँग्रेसचे २९ उमेदवार निवडणूक जिंकले होते. मात्र, निवडणुकीनंतर गटनेतेपदावरून या २९ नगरसेवकांमध्येही फूट पडली होती. महापालिकेच्या निवडणुकीत आमदार विकास ठाकरे यांचा पराभव झाला होता. मात्र, गटनेतेपदी ठाकरे यांचे समर्थक संजय महाकाळकर यांची निवड करण्यात आली होती.

महाकाळकर यांच्या निवडीला काँग्रेस पक्षातील दुसऱ्या गटातील नेत्यांनी विरोध दर्शविला होता. महाकाळकर यांच्या निवडीनंतर त्यांना आव्हान देत दुसऱ्या गटाने तानाजी वनवे यांची गटनेतेपदी निवड केली होती. त्या वेळी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्यासह सुमारे १८ नगरसेवकांनी ठाकरे यांना विरोध करत दुसरा गट स्थापन केला होता. मात्र, काँग्रेसचे हे सर्व नगरसेवक आता लोकसभा निवडणुकीत एकत्र आले आहेत.

नागपूरमधील (Nagpur) तीन मातब्बर काँग्रेस नेते माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार हे एकत्र आले आहेत, त्यामुळे एकमेकांमध्ये भांडणारे काँग्रेसचे हे २९ नगरसेवकही सध्या विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी एकदिलाने काम करीत आहेत. त्यामुळे ठाकरे विरोधक नगरसेवकांचाही नाईलाज झाला आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो, याची जाणीव या नगरसेवकांना झाली आहे.

Nagpur Lok Sabha 2024
Congress On Sanjay Raut: सांगलीचा वाद चिघळणार, संजय राऊतांच्या दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ

भाजपकडे (BJP) सध्या 108 माजी नगरसेवकांची फौज आहे. त्यातील अनेकांना पुन्हा महापालिका लढवायची आहे. महापालिकेचा कार्यकाळ सुमारे दोन वर्षांपासून संपलेला आहे. महापालिका निवडणुकीला सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्द्यावरून स्थगिती आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही लोकसभेनंतरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकीट पाहिजे असेल तर भाजपच्या माजी नगरसेवकांना आपल्या वॉर्डातून आता लीड द्यावेच लागणार आहे. तसेच, काही नवे इच्छुक आपली ताकद दाखवण्यासाठी कामाला लागले आहेत.

गत निवडणुकीत जिंकलेले प्रवीण दटके हे आमदार झाले आहेत. महापौर संदीप जोशी यांनी यापुढे आपण महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे आहेत. आमदारकीचे वेध काही नगरसेवकांना लागले आहेत, त्यामुळे कामगिरी दाखवली नाही तर नव्यांना संधी मिळू शकते. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या माध्यमातून एक नवीन पिढी पालिकेच्या राजकारणात येण्याची शक्यता आहे.

R

Nagpur Lok Sabha 2024
Dharashiv Lok Sabha Constituency : 'मित्रां'ची नाराजी दूर करण्याचे राणा पाटलांसमोर चॅलेंज!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com