Laxman Hake : 'आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू, कोर्टात जाऊ, पण रायगडावरील ते शिल्प हटवू देणार नाही' ओबीसी नेत्याने ठणकावलं

Laxman Hake On Ex MP Sambhajiraje : स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्यानंतर अनेकांनी यातच उडी घेतली आहे.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati sarkaranama
Published on
Updated on

Pune News : स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्यानंतर आता नवा मुद्दा आणि वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणात आता ओबीसी नेत्याने देखील उडी घेत तारखेचा मुद्दा उपस्थित करताना, रायगड वरील ते शिल्प हटवून देणार नाही, गरज पडल्यास न्यायालयात जाऊ असा उशारा दिला आहे. तर हा इशारा थेट माजी खासदार संभाजीराजे यांना मानला जातोय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड समाधीस्थळाजवळ असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून नवा वाद सुरू झाला आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी हा मुद्दा उचलला असून ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा कुठलाही आधार नसल्याचे म्हटलं होते. त्यावरून संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण येताना दिसत आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी याप्रकरणी संभाजीराजेंवर निशाना साधला आहे. संभाजीराजें यांनी दिलेल्या 31 तारखेच्या अल्टिमेटवर हाके यांनी अक्षेप घेतला. आहे. हाके यांनी, वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून संभाजी राजे भोसले यांनी 31 तारखेचा अल्टिमेट दिला आहे. पण याला राज्यातील तमाम ओबीसी बांधवांकडून अक्षेप असून संभाजीराजेंनी 31 तारीखच का निवडली असा प्रश्न केला आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Laxman Hake Allegations : 'खोक्याभाई'नंतर आता आमदार धसांचे पोलिस दलात वसुली एजंट अन् बरचं काही..; लक्ष्मण हाकेंच्या गंभीर आरोपानं खळबळ

संभाजीराजेंना रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष बनवण्यात आला असून त्यांनी किल्ल्याच संवर्धन करावे. पण हे काम सोडून ते किल्ल्याची नाशिस्तीकरण करत आहेत. त्यांनी या कुत्र्याच्या समाधीवरून अल्टिमेटमची जी तारीख ठरवली आहे. त्यादिवशी मातोश्री अहिल्यादेवींची जयंती असते. त्यांच्या 300 जयंती दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या गावी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पण आता आमच्या या प्रयत्नांना अडथळा आणण्यासाठीच संभाजीराजेंनी मुद्दाम ही तारीख ठरवली असा दावा हाके यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राचं वातावरण कलूशीत करण्याचा प्रयत्न संभाजीराजे करत आहेत, असा आमचा आरोप आहे. संभाजीराजेंच्या या मुद्द्याला धनगर समाज म्हणून आमचा विरोध असल्याचेही हाके यांनी म्हटलं आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Laxman Hake : नवनाथ दौंड जरांगेंचा 'राईट हॅन्ड' तर खोक्याचा आका धसच; जरांगेंसह धसांवर लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

तसेच ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धारझाला होता. त्यावेळी होळकरांनी मोठी मदत केली होती. त्यावेळी टिळक, फुले आणि होळकर हेतूविषयी यांच्या काही आक्षेप नव्हता. या समाधीची नासधूस कोणी केली नाही. पण आता रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजीराजे येथे नासधूस करत आहेत. यामुळे त्यांची प्राधिकरणावरून छत्रपती संभाजीराजे यांची हकालपट्टी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Laxman Hake : '...तर धनंजय मुंडेंना सहआरोपी करा', लक्ष्मण हाके संतापले

यावेळी संभाजीराजेंच्या या भूमीकेला आपला विरोध असून यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहू. गरज पडल्यास कोर्टातही जाऊ, पण रायगडवरील ते शिल्प हटवून देणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com