Sunil Kedar News : काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांनी वाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडलेला उमेदवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक निघाला आहे. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि संघाच्या पथसंचलनात खाकी पँट आणि काळी टोपी घालून सहभागी झालेल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रेम झाडे यांचे फोटो शोधून काढले आहेत. हे सर्व फोटो नागपूर जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
प्रेम झाडे यापूर्वी वाडी नगरपालिकेचे भाजपचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी भाजपचे आमदार समीर मेघे यांच्यासोबत त्यांचे चांगलेच खटकले होते. झाडे यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यांच्या घरून दोन लाख रुपये रोख जप्तसुद्धा केले होते. तेव्हापासून त्यांचे आमदार मेघे आणि भाजपशी खटकले. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुनील केदार यांनी झाडे यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन एबी फॉर्म दिला. त्यापूर्वी झाडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही एबी फॉर्म घेतला होता. दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म जोडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिल्याने वाडी नगर पालिका क्षेत्रातील काँग्रेसच्या सुमारे दोनशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
सुनील केदार यांच्या मनमानीची तक्रार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आपल्याकडे कोणाचाच राजीनामा पोहोचला नाही, हे वृत्त मला मीडियातूनच कळले असे सांगून या वादावर बोलण्याचे टाळले आहे.
दरम्यान, केदारांनी बाहेरच्या उमेदवारांना तिकिटे दिल्याने संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. केदारांनी आणलेल्या प्रत्येक उमेदवाराची बारीकसारीक माहिती व इतिहास गोळा करून ते पक्ष श्रेष्ठींकडे पाठविली जात आहे. बुटबोरी नगर परिषदेत केदारांनी संघाच्या स्वयंसेवकाला पाठिंबा दिला आहे. येथे काँग्रेसने पक्षाचे चिन्ह त्याला दिले नाही.
आता प्रेम झाडे यांचे संघाच्या गणवेशातील तसेच भाजपच्या नेत्यांसोबतचे छायाचित्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढले आहे. ते प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडे केदारांच्या विरोधातील पुरावा म्हणून पाठवले आहे. काही केंद्रातील बड्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे सर्व छायाचित्रे राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.