Abhijeet Patil On BJP : अभिजीत पाटलांचं मोठं विधान; ‘भाजपचा मला चांगलं अन्‌ वाईट असा दोन्ही अनुभव, भविष्यात त्याची उत्तरे देऊ’

Nagar Palika Election 2025 :पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभा केला आहे. त्यांनी भाजपचे चांगले व वाईट अनुभव असल्याचे सांगितले व भविष्यात त्याबाबत स्पष्ट करतील.
Abhijeet Patil
Abhijeet Patil Sarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपविरोधात आघाडीचा प्रयत्न करणारे आमदार अभिजीत पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करून राजकीय समीकरण बदलले आहे.

भाजपमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आल्याचे सांगत त्यांनी २३ नोव्हेंबरला सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे संकेत दिले.

प्रस्थापितांविरोधात लढत राहणार असल्याचे सांगत भाजप प्रवेशांमुळे
माढ्यात त्यांच्यावर परिणाम होणार नसल्याचा
दावा केला.

Solapur, 21 November : पंढपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी उभा करण्यासाठी पुढाकार घेणारे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी शेवटी स्वतंत्र पॅनेल उभा केले आहे. माजी अमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना ‘भाजपचे मला चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले आहेत. भविष्यात त्याबाबतची उत्तरे दिली जातील, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

माढ्यात मा्ध्यमांशी बोलताना आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत तिसरी आघाडी करून भाजपला मदत केली का? आणखी काही? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या २३ नोव्हेंबरला दिली जातील.

सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी भाजपसंदर्भात असे वक्तव्य का केले, त्याबाबत तेच अधिक चांगलं सांगू शकतील. ते मोठे वक्ते आहेत. प्रत्येकाला भाजपचे (BJP) वेगवेगळे अनुभव येत असतात. मला दोन्ही (चांगले आणि वाईट) अनुभव आले आहेत. भविष्यात त्याची उत्तर देऊ, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार अभिजीत पाटील म्हणाले, रणजित शिंदे, विक्रम शिंदे हे भाजपत गेले तरीही आम्ही प्रस्थापितांविरोधात निवडून आलो आहोत. माढ्यातील जनतेला त्याची जाण आहे, त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत माझ्यावर कमळाचा परिणाम होणार नाही. पक्षात येणारी-जाणारी लोकं स्वत:च्या सोयीसाठी जात येत असतात.

Abhijeet Patil
Shivendraraje Statement : पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या भाजप महिला नेत्याबाबत शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा....

आता जशी भाजपमध्ये प्रवेशाची गर्दी होती, तशी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाणारे येणारे हेाते. सत्तेमुळे ते जात आणि येत असतात. पण जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजेत. मतदारसंघातील विकास कामांना गती मिळाली पाहिजे. पक्ष, पार्ट्यापेक्षा विकासावर चर्चा करण्यावर भर दिला पाहिजे, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

माढ्यात आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढत राहणार आहे. रणजित शिंदे यांनी जिल्हा दूध संघातील भ्रष्टाचार अथवा अन्य अवैध कामांच्या अडचणीच्या गोष्टींमुळे त्यांनी भाजपत प्रवेश केला असावा, असे मला वाटते. लोक प्रस्थापितांना हटविण्यासाठी एकत्रित आले आहेत. पुढील काळातही आम्ही त्यांच्या विरोधात लढा देऊ. तसेच, विठ्ठल कारखान्याने सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा सुरू केली आहे, असा दावाही आमदार पाटील यांनी केला.

Abhijeet Patil
ShahajiBapu Vs Gore : जयकुमार गोरेंचा पलटवार; ‘शहाजीबापू, दुसऱ्याला दोष देताना आपण काय केलंय, हे बघितलं पाहिजे’

प्र.1 — आमदार अभिजीत पाटील यांनी काय निर्णय घेतला?
→ पंढरपूर नगरपरिषदेसाठी स्वतंत्र पॅनेल उभे केले.

प्र.2 — भाजपबाबत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली?
→ भाजपमध्ये चांगले-वाईट दोन्ही अनुभव आल्याचे सांगितले.

प्र.3 — आगामी निवडणुकांवर भाजपचा परिणाम होणार का?
→ नाही, विकासावर भर असल्याने परिणाम होणार नसल्याचा दावा.

प्र.4 — त्यांनी कोणाविरोधात राजकीय लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला?
→ प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com