Amravati Congress : वाद पेटविण्यासाठी भाजपनं व्हायरल केला जातीचा खोटा दाखला

MLA Balwant Wankhede : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दाखला दाखविण्याचे आव्हान
MLA Balvant Wankhede & Sharad Pawar
MLA Balvant Wankhede & Sharad PawarGoogle

Maratha Reservation & OBC : महाराष्ट्रात जातींमध्ये वाद वाढावे, यासाठी भारतीय जनता पार्टीनंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जातीचा खोटा दाखला व्हायरल केला, असा दावा काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांनी सोमवारी (ता. १३) केला. अमरावती येथे त्यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

भाजपला केवळ खोटेपणाचं राजकारण येतं. त्यामुळे जातीय तणाव निर्माण व्हावे व त्यातून आपल्याला राजकीय फायदा व्हावा, या हेतूनेच त्यांनी खोटा दाखला जाणीवपूर्वक व्हायरल केला, अशी टीका त्यांनी केली. (Congress MLA Balwant Wankhede from Amravati District Claims BJP Made Fake Caste Certificate of NCP Leader Sharad Pawar Viral)

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यातूनच शरद पवार यांचा जातीचा खोटा दाखला व्हायरल करण्यात आलाय. हा दाखला व्हायरल झाल्यानंतर तणाव वाढला होता. यासंदर्भात विरोधक भाजपवर तुटून पडले आहेत. यावर आमदार वानखडे यांनी प्रतिक्रिया देताना हे भाजपचंच षडयंत्र असल्याची टीका केलीय. भाजपलाच जाती-धर्माचा खेळ चांगल्या पद्धतीनं येतो, असं ते म्हणाले.

भाजपनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दाखला दाखवावा, असं आव्हानही आमदार वानखडे यांनी दिलंय. भाजप नीच प्रवृत्तीचं राजकारण नेहमीच करतं. या वेळी त्यांनी आपली प्रवृत्ती दाखविली आहे. मात्र, अशा कृतीमुळं राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असते, याकडं वानखडे यांनी लक्ष वेधलं. जात दाखविण्याची एवढीच हौस असेल तर भाजपनं नरेंद्र मोदी यांची जात सांगावी. त्यांचे जात प्रमाणपत्र जाहीरपणे प्रकाशित करावं, असंही आमदार वानखडे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप लोकांच्या प्रश्नांवरून लक्ष भरकटविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. समाजांमध्ये तेढ निर्माण करणं ही भाजपची जुनी कार्यशैली आहे. हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्यासोबतच आता मराठा आणि ओबीसी समाजाला लढवत ठेवायचं, अशी भाजपची योजना आहे. मराठा आणि ओबीसी समाजानं या चिथावणीला बळी न पडता भाजपला धडा शिकवावा, असं आवाहनदेखील आमदार वानखडे यांनी या वेळी केलं. आगामी निवडणुकीत भाजपला त्यांच्या जातीयवादी भूमिकेचा मोठा फटका बसेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला. मतदारच त्यांना धडा शिकवेल, असंही ते म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

MLA Balvant Wankhede & Sharad Pawar
Amravati : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, पीकविमा न मिळाल्यास कार्यालय फोडणार; आमदार वानखडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com