Amravati : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, पीकविमा न मिळाल्यास कार्यालय फोडणार; आमदार वानखडे

Balwant Wankhade : अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.
Balwant Wankhade
Balwant Wankhade Sarkarnama
Published on
Updated on

Amravati News : दिवाळी सुरू झाली असतानाही अद्यापही पीकविमा नुकसानभरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळाली नाही. या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी पीकविमा कंपनीसमोर आंदोलन सुरू आहेत. काही ठिकाणी कार्यालयाची तोडफोड केल्याच्या घटनाही घडल्या.

अमरावतीत शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही, त्यामुळे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी थेट पीकविमा कार्यालय फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात पावसाने महिनाभरापेक्षा अधिक कालखंड गेला तरी पाऊस नव्हता, तर 25 टक्के अग्रिम पीकविमासुद्धा त्यावेळी मिळालेला नाही.

Balwant Wankhade
Radhakrishna Vikhe: विखे, तुम्ही संधीसाधू, इकडे तिकडे उड्या मारून मंत्रिपदं घेता; थोरातांचा हल्लाबोल

अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, तर राज्य व केंद्र सरकारने त्यासाठी 283 कोटी रुपये भरले तरीदेखील पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम दिलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी पूर्णपणे अंधारात आहे. "दोन दिवसांत शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे न दिल्यास पीकविमा कार्यालय फोडून टाकू," असा इशारा बळवंत वानखडे यांनी दिला.

काल (गुरुवारी) अकोल्यात पीक कंपनीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली. जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान. संतप्त शिवसैनिकांनी दुपारी कौलखेड मार्गावरील पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. या वेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यंदा सोयाबीन कापसाचा उतारा घटला आहे. इतरही पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पिके वाहून गेली आणि जमीनही खरडून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. सोयाबीन, कपाशी आदी मुख्य पिकांचे सरासरी उत्पादन कमी झाले. बाजारातील भावसुद्धा पडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला.

Balwant Wankhade
Suresh Kute : बीडचे दिग्गज उद्योजक भाजपच्या वाटेवर; सुरेश कुटेंचा लवकरच प्रवेश!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com