Yavatmal Bank : काँग्रेस आमदाराने खुन्नस काढली; विधानसभेला मदत न करणाऱ्या यवतमाळ जिल्हा बॅंक अध्यक्षांना अडचणीत टाकण्याचा डाव?

Vidharbha Political News : आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ₹516 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली असून भरती प्रक्रियेवरही राजकीय वाद सुरू आहे.
Yavatmal District Bank
Yavatmal District BankSarkarnama
Published on
Updated on
  1. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ५१६.६५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला, मात्र प्रत्यक्षात तो साडेचार कोटींच्या घरात असल्याचे स्पष्ट झाले.

  2. बँकेच्या १३३ नोकरभरतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदारांनी चौकशीची मागणी केली आहे.

  3. आमदार आणि बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्यातील राजकीय मतभेदांमुळे आरोपांमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा रंगली आहे.

Yavatmal, 09 October : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू असतानाच बँकेत 516.65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करून आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. प्रत्यक्षात हा घोटाळा साडेचार कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या बँकेला 133 जागांच्या नोकरभरतीसाठी मंजुरी मिळाली आहे. यावरून सध्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदारांचा आरोप नेमका कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर (MLA Balasaheb Mangulkar) यांना यवतमाळ जिल्हा बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष मनीष पाटील यांनी सहकार्य केले नव्हते, त्यानंतर आमदार मांगुळकर यांनी यवतमाळ जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहाराचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आरोपामागे नेमके कारण काय की आमदारांनी निवडणुकीत मदत न करणाऱ्या अध्यक्षांना अडचणीत आणण्याचा डाव तर टाकला नाही ना, असा सवाल चर्चिला जात आहे.

मुंबईच्या सहकार सचिवांनी यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतील (Yavatmal District Bank) अनियमितता आणि अवैध नोकरभरतीची १० दिवसांच्या आत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचा दावा आमदार मांगुळकर यांनी केला आहे. याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक रिट याचिका दाखल आहे. याचा दाखला देत आमदारांनी ५१६.६५ कोटीचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे.

आधीच बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना १३३ जागांची भरती केली जात आहे. भरती प्रक्रियेचे कंत्राट वारंवार एकाच एजन्सीला का दिले जात आहे, असा सवालही आमदारांनी उपस्थित करून या नोकर भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Yavatmal District Bank
Solapur BJP : सोलापूर भाजपमध्ये वाद पेटला; आमदार देशमुखांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, कोठे, शहराध्यक्षांनी सूचना केल्याचा आरोप

मनीष पाटील यवतमाळ जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी सहकार्य केले नसल्याची नाराजी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यापूर्वीच व्यक्त केली होती. त्यामुळे या आरोपामागे काही राजकीय वास तर नाही ना?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यवतमाळ जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेवर एकेकाळी पुसदच्या नाईक घराण्याचे वर्चस्व होते. सुधाकरराव नाईक यांचे समर्थक असलेले विजय चव्हाण हे अनेक वर्षे या बँकेचे अध्यक्ष होते. यातच बँकेने नोकरभरती जाहीर केली आहे.

या नोकरभरतीत आपल्या समर्थकांचा, कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी बँकेचे आजी-माजी संचालक, आमदार, लोकप्रतिनिधी यांच्यात स्पर्धा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदारांनी केलेल्या आरोपावर यवतमाळ जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Yavatmal District Bank
Anil Parab: योगेश कदमांविरोधात अनिल परब पुन्हा मैदानात : घायवळ प्रकरणात थेट PM मोदींचं नाव घेत फडणवीसांनाही पकडलं कोंडीत

प्रश्न 1 : यवतमाळ जिल्हा बँकेवरील आरोप कोणी केले?
आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी.

प्रश्न 2 : आमदारांनी किती कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला?
५१६.६५ कोटींचा, परंतु प्रत्यक्षात साडेचार कोटींच्या आसपास असल्याचे समोर आले.

प्रश्न 3 : बँकेत किती नोकरभरती होणार आहे?
एकूण १३३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

प्रश्न 4 : या प्रकरणामागे राजकीय कारण असल्याचे का म्हटले जाते?
अध्यक्ष मनीष पाटील यांनी निवडणुकीत मांगुळकर यांना सहकार्य केले नसल्याने वाद उभा राहिल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com