Nagpur Congress : काँग्रेसच्या आमदाराचे गडकरी अन् फडणवीसांवर गंभीर आरोप ; म्हणाले, 'नागपुरात भाजपकडून...'

Vikas Thackeray On BJP : महायुती सरकारने नागपूरमध्ये एक लाख कोटींच्या विकास कामांचा ढोल पिटला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मते मागितली. मात्र प्रत्यक्षात लोकांना काय फायदा झाला नसल्याचे दिसते.
 Vikas Thackeray Nitin Gadkari
Vikas Thackeray Nitin Gadkari sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमध्ये भाजपचे दोन वजनदार नेते राहातात. वर्षभरात एक लाख कोटींचा विकास केला असल्याचा दावा त्यांनी केला होता. हे आकडे सांगून मोठी जाहिरातबाजी केली जात आहे. हे खरे असेल तर लोकांना विकास काय दिसत नाही, पावसाळ्यात घराघरांमध्ये पाणी शिरते असा सवाल करून काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावर तोफ डागली.

नागपूर सलग तीन दिवस पाऊस कोसळला. अनेक वस्त्या जलमय झाल्या आहेत. जागोजागी पाणी साचले आहे. काही अंडरपासमध्ये माणूसभर पाणी साचले आहे. नदी, नाले साफ झाले नसल्याचे यावरून स्पष्ट होते. हे बघता भाजपचे नेते खोट्या आकड्याचे राजकारण खेळत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. नागपूरकरांना केवळ जाहिरात नको तर खराखुरा विकास हवा आहे असे सांगून त्यांनी सर्व विकास कामांचे ऑडिट करण्याची मागणी विधानसभेत केली.

नागपूर महापालिकेत पंधरा वर्षे भाजप सत्तेत होती. मागील वर्षी पावसाळ्यात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर नेत्यांना आणि महापालिका प्रशासनाला जाग आली. नद्या नाल्यांचे खोलीकरण आणि स्वच्छाता करण्याचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले, मोठे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, तेसुद्धा आश्वासन पाळण्यात आली नाही. महापालिकेने खरोखरच नदी नाल्यांची स्वच्छता केली असती तरी आज पुन्हा तीच परिस्थिती उद्‍भवली नसती. एक वर्षात खरंच शहरात कोट्यवधींचे कामे झाली आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कामे केली की नुसतीच देयके उचलली? असा सवाल त्यांनी केला.

 Vikas Thackeray Nitin Gadkari
Eknath Shinde: आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये टॉवेल,बनियनवर राडा; शिंदेंनी संजय गायकवाडांना झापलं; म्हणाले,'कायदेशीर मार्गानं...'

दोन बडे नेते असताना नागपूर महापालिकेच्या प्रशासनावर कोणाची पकड नाही असा याचा अर्थ निघतो. केंद्रात आणि राज्यात वजन असलेल्या नेत्यांना शहराची परिस्थिती हाताळता येत नसेल तर लोकांनी कोणाकडे दाद मागायची असा सवाल त्यांनी केला.

महायुती सरकारने नागपूरमध्ये एक लाख कोटींच्या विकास कामांचा ढोल पिटला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मते मागितली. मात्र प्रत्यक्षात लोकांना काय फायदा झाला नसल्याचे दिसते. महापालिकेच्या कामांचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणीही विकास ठाकरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com