
Mumbai News : महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच महायुती सरकारची डोकेदुखी वाढली आहे. आपल्या वादग्रस्त विधानं आणि आक्रमक स्टाईलनं नेहमीच अडचणीत सापडणारे बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणावरुन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेमुळे राजकारण तापलं आहे. या मारहाणीनंतर आता उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही गायकवाडांना कडक शब्दांत समज दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता.9) मीडियाशी संवाद साधताना आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील मारहाण प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी आपण याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना समज दिली असल्याची माहिती दिली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणाले,निकृष्ट जेवणामुळे कोणालाही त्रास होऊ शकतो. संजय गायकवाड यांना खराब जेवणामुळे उलटी झाली आणि रागाच्या भरात त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. पण आमदार हे लोकप्रतिनिधी असतात. त्यांना कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा अधिकार आहे. अशाप्रकारे मारहाण करणं अयोग्य असून मी स्वतः गायकवाड यांना याबाबत समज दिल्याचं शिंदेंनी सांगितलं.
तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो,त्याने आपली जबाबदारी समजून आणि कर्तव्याचे भान ठेवून वागले पाहिजे, अशा शब्दांत गायकवाड यांचे कान टोचले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांवरही हल्लाबोल केला.ते म्हणाले,विरोधक रोज विविध मुद्द्यांवर बोलतात. आम्ही त्यांना सभागृहात बोलण्याची संधी देतो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार असतो. पण त्यांना सभागृहाबाहेर बोलण्यातच जास्त रस असल्याचा चिमटाही काढला.
विधान परिषदेत चर्चासत्रादरम्यान,शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा...अशा लोकांना तुम्ही पाठिंबा देणार का..अशा आमदारांचं निलंबन करावं,अशी मागणी केली.तसेच एका आमदाराने कसं राहावं, बनियन, टॉवेलवर-लुंगीवर आमदार येतो. रस्त्यावर राहताय का?,असा घणाघातही परब यांनी केला होता.
यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी या प्रकरणाची माहिती घेतली आहे. असं वर्तन योग्य नाही. तिथून माहिती आली की, भाजीला वास येत होता. परंतु मारहाण करणे योग्य नाही,असं त्यांनी सांगितलं.
याचदरम्यान,फडणवीसांनी लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं योग्य नाही.अशा मारहाणीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापती यांनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले. तसेच अनिल परबजी टॉवेलवर मारलं किंवा कसंही मारलं, ते चुकीचं आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.