Congress News : काँग्रेसचे आमदार ठाकरे पडले भाजपवर भारी

Political News : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे शहर अध्यक्ष, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पराभूत करण्यात अपयश आले असले तरी भाजपचे सर्वाधिक इलेक्ट्रॉल बॉंड खरेदी करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला त्यांनी धोबीपछाड दिला.
 Vikas Thackeray Nitin Gadkari
Vikas Thackeray Nitin Gadkari sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे शहर अध्यक्ष, पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पराभूत करण्यात अपयश आले असले तरी भाजपचे सर्वाधिक इलेक्ट्रॉल बॉंड खरेदी करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला त्यांनी धोबीपछाड दिला. या कंपनीकडून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचे सर्व मनसुबे ठाकरे यांनी उधळून लावले आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्यावतीने शहरातील बस संचलन केले जाते. शहरातील करिता २५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. महाराष्ट्र सरकारच्या एमएसआरटीसीने पाच हजार इलेक्ट्रिक बसेससाठी मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या उपकंपनीसोबत ७८ रुपये प्रति किलोमीटर दराने करार केला होता. याकरिता १.४२३ कोटी रुपये मोजावे लागणार होते. एकाच कंत्राटदाराची बोली आली असतानाही कंत्राट देण्याची सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. (Congress News

यात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचे लक्षात येताच विकास ठाकरे (VIkas thackeray ) यांनी विरोध करणे सुरू केले. राज्यात महायुतीची सत्ता असताना आणि नागपूर महापालिकेची सूत्रे सर्व हातात असतानाही ते भाजपच्या सर्व नेत्यांवर भारी पडले. त्यांनी इलेक्ट्रिक बस खरेदी आणि संचालनाची निविदा बदलण्यास भाग पाडले. तत्पूर्वी आंदोलनाचाही इशारा दिला होता.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे घोटळ्याकडे लक्ष वेधले होते तसेच याचे परिणाम भोगावे लागतील असाही इशारा दिला होता. त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. त्यामुळे प्रशासनाला नव्याने निविदा उघडावी लागली.

विशेष म्हणजे यावेळी सर्वात कमी दरात इलेक्ट्रिक-चलित बसेसच्या खरेदी आणि संचालनासाठी निविदा प्राप्त झाली. इका मोबिलिटी आणि हंसा ट्रॅव्हल्सच्या संयुक्त उपक्रमाने प्रति किमी ६२.९ या कंपनीने तयारी दर्शवली आहे.

 Vikas Thackeray Nitin Gadkari
Congress Politics : नागपुरचे निरीक्षक गायब, काँग्रेस इच्छुकांची धाकधूक वाढली

लोकसभेत पराभव झाला असला तरी ठाकरे आता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ते पश्चिम नागपूरचे आमदार आहेत. त्यांच्याच नेतृत्वात नागपूर शहरात विधानसभेची निवडणूक लढली जाणार आहे. लोकसभेत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही त्यांनी चांगलीच झुंज दिली होती. त्यांचा पाच लाख मताधिक्यांनी विजयाचा दावा उधळून लावला होता.

 Vikas Thackeray Nitin Gadkari
Nitin Gadkari : विमानतळाच्या कामासाठी मीच ‘सुपरवायझर'..., नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना भरला दम

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com