Congress Politics : नागपुरचे निरीक्षक गायब, काँग्रेस इच्छुकांची धाकधूक वाढली

Congress Assembly Election Nagpur Nasim khan: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हानिहाय मुलाखती घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली होती.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : नागपूर शहरात भाजपच्या वतीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्‍घाटन, भूमिपजूनाचा धडाका लावला आहे. जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघ ढवळून काढले जात असताना काँग्रेस कमिटीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे निर्देश देऊनही निरीक्षक फिरकले नसल्याने मोठी नाराजी आहे.

काँग्रेसकडून नागपूरसाठी माजी मंत्री नसीम खान यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ते अद्यापही नागपूरकडे फिकलेच नाहीत. त्यामुळे विधानसभेची निवडणूक लढण्याच इच्छुक आणि उत्सुकांची निराशा झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व जिल्ह्यातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हानिहाय मुलाखती घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पाच इच्छुकांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे. दक्षिण नागपूरमधून 9, नागपूर पूर्वमधून 12 तर मध्यमधून सर्वाधिक 33 जणांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. उत्तर आठ तर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून पाच जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

Congress
Ajit Pawar : बारामतीतून लढणार की नाही, अजितदादांनी सस्पेन्स आणखी वाढवला

पश्चिमध्ये स्वतः विकास ठाकरे आणि उत्तरमध्ये माजी मंत्री नितीन राऊत आमदार आहेत. त्यांची तिकीट निश्चित मानली जाते. चार मतदारसंघासाठी निरीक्षकांना प्रामुख्याने मुलाखती घ्यायच्या होत्या. दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली आहे.

उमेदवारीसाठी चुरस

पूर्व नागपूरमधून पुरुषोत्तम हजारे आणि संगीता तलमले या प्रबळ दावेदार आहेत. दक्षिण नागपूरवर गिरीश पांडव यांच्यासह विशाल मुत्तेमवार आणि अतुल लोंढे हेसुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. यावेळी मध्य नागपूरमध्ये सर्वाधिक चुरस आहे. तब्बल 33 इच्छुकांनी येथून उमेदवारी मागितली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी कुकडे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मागितली आहे.

याशिवाय हलबा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष नंदा पराते, माजी अध्यक्ष नॅश अली, उद्योग व व्यापर आघाडीचे अध्यक्ष अतुल कोटेचा हे येथून प्रमुख दावेदार आहेत. माजी मंत्री अनिस अहमद, हैदरअली दोसानी यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे.

Congress
Devendra Fadnavis : 'मविआ'चा फेक नरेटिव्ह संपला; फडणवीस म्हणाले, 'देशाचा मूड...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com