MNS-Congress Friendship : काँग्रेस खासदाराचा सत्कार; मनसे-काँग्रेसच्या नव्या मैत्रीची विदर्भात चर्चा!

Vidarbha Political News : मराठी माणसाला पटक पटक मारेंगे असे खुले आव्हान देणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांना घेराव घालून त्यांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास भाग पाडणाऱ्या खासदारांची मनसेच्या नेत्यांनी प्रशंसा केली.
Raj Thackeray-Harshwardhan Sapkal
Raj Thackeray-Harshwardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 26 July : मराठी भाषेच्या मुद्यावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे सूर जुळू लागले असल्याचे दिसून येते. हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसेने महायुती सरकारला कडक इशारा दिला होता. आंदोलनाची तारीखही जाहीर केली होती. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला होता. मराठी माणसाला पटक पटक मारेंगे असे खुले आव्हान देणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांना घेराव घालून त्यांना ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास भाग पाडणाऱ्या खासदारांची मनसेच्या नेत्यांनी प्रशंसा केली. यात काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचाही समावेश होता.

मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज (शनिवारी, ता. 26 जुलै) प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मात्र, काँग्रेस नेत्यांची जाहीर प्रशंसा आणि सत्काराच्या माध्यमातून मनसे महाविकास आघाडीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची चर्चा यावरून रंगली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग चांगलाच गाजला होता. उद्धव ठाकरे हे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते. एवढेच नव्हे तर अडीच वर्षे राज्यात आघाडीची सत्ता होती. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा कट्टर हिंदुत्वाची, तर काँग्रेसचे धोरण धर्मनिरपेक्ष असतानाही ते भाजपच्या विरोधात एकत्र आले होते. त्यानंतर भाजपने महायुतीचा प्रयोग करून आघाडीला पराभूत केले.

आघाडी आणि महायुतीच्या प्रयोगाने महाराष्ट्रात राजकीय अस्पृश्यता संपवली, असे दावे केले जात असले तरी यात राजकीय सोय बघितल्याचाही आरोप होत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. विधानसभेच्या निवडणुकीत काही ठिकाणी मनसेने उमेदवार उभे केले होते. त्याचा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसला असल्याचे दिसून येते.

Raj Thackeray-Harshwardhan Sapkal
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंनीही केली तलवार म्यान; म्हणाले, ‘मी महाराजसाहेबांना (रामराजेंना) सर्व अधिकार दिले आहेत...’

हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सर्व एकत्र आले असले तरी महाविकास आघाडीत मनसेला स्थान देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. राज आणि उद्धव ठाकरे बंधू यांच्या विजयोत्सव सभेतही काँग्रेस सहभागी झाली नव्हती. मराठी, हिंदी सक्तीचा वाद सुरू असताना खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना महाराष्ट्राच्या बाहेर आल्यास पटक पटक के मारेंगे, असा इशारा दिला होता. त्याला, ‘दुबे तुम्ही मुंबईत या, तुम्हाला समुद्रात बुडवून मारू,’ असे आव्हान ठाकरेंनी दिले होते.

Raj Thackeray-Harshwardhan Sapkal
Sharad Sonawane : शिवसेना प्रवेशाचा निर्णय अंगलट; जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंना पक्षांतर बंदीची नोटीस

संसदेच्या लॉबीत निशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील मराठी महिला खासदारांनी अडवून त्यांना ‘पटक पटक के मारेंगे’ या विधानाबद्दल जाब विचारण्यात आला. महिला खासदारांनी त्या वेळी जय महाराष्ट्राचा घोष करताच दुबे यांना तेथून पळ काढावा लागला. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या सर्व महिला खासदारांची जाहीर प्रशंसा केली आहे. त्यानंतर नागपूरच्या मनसेच्या पदाधिकारी शनिवारी सांयकाळी रवी भवन या सरकारी विश्राम गृहावरून जाऊन चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com