Lok Sabha Election 2024 : विदर्भात टिकायचे तर काँग्रेसला टाळावे लागेल मतांचे विभाजन

Vidarbha Pollitics : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले तरच काँग्रेसला ‘अच्छे दिन’ दिसण्याची शक्यता
Congress & Prakash Ambedkar.
Congress & Prakash Ambedkar.Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : विदर्भात आज भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य आहे. दहापैकी आठ खासदार हे भाजपचे आहेत, तर एका अपक्षाचा भाजपलाच पाठिंबा आहे. काँग्रेसची जमेची बाजू म्हणजे आजही पूर्व आणि प्रश्चिम विदर्भ अशा दोन्ही भागांत काँग्रेसचा मतदार टिकून आहे. काँग्रेसला खरोखर काही करून दाखवायचे असेल तर त्यांच्या मतांचे विभाजन टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले तरच काँग्रेसला ‘अच्छे दिन’ दिसण्याची शक्यता आहे, अन्यथा भाजप आपला वरचष्मा कायम राखण्यात यशस्वी होईल, अशी स्थिती आहे.

लोकसभेच्या आगामी रणसंग्रामात विदर्भ हा सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. आज भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष हे विदर्भातील आहेत. एकेकाळी अगदी संकटकाळात विदर्भाने काँग्रेसला साथ दिली आहे. परंतु गेल्या काही दशकांत काँग्रेसचे विदर्भातील वर्चस्व कमी होत गेले. गेल्या लोकसभा निवडणुकीत तर दहापैकी आठ जागांवर भाजपचे खासदार विजयी झाले. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने विजय मिळविला खरा, परंतु नंतर भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता तर त्या अपक्ष आहेत की, भाजपच्या खासदार हे सांगणे कठीण झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress & Prakash Ambedkar.
Prakash Ambedkar News : महाविकास आघाडीबाबत आंबेडकरांनी व्यक्त केली 'ही' शंका; राऊतांवरही केला आरोप

चंद्रपुरात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते. परंतु त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर विदर्भात काँग्रेसमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले. परंतु एकजूट दाखविल्याशिवाय काँग्रेसची शक्ती दिसणारच नाही. दरम्यानच्या काळात राज्याच्या राजकीय पटलावर अनपेक्षित बदल घडले आहेत. त्यामुळे लोकसभेसाठीचे जागावाटप व योग्य उमेदवारीवरच विजयाचे गणित ठरणार आहे. भाजपही काही विद्यमान खासदारांना नारळ देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटासोबतही काही जागांवर भाजपची रस्सीखेच सुरू आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेसंदर्भात प्रफुल पटेल हे आग्रही आहेत. गडचिरोलीच्या जागेवरही धर्मरावबाबा अत्राम आग्रही आहेत. अजित पवार गटाच्या या दोन्ही नेत्यांचा आग्रह मोडणे तितके सोपे नाही. तिकडे शिंदे गटाकडे असलेल्या रामटेकच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. महाविकास आघाडीतही वर्धा, अकोला, यवतमाळ-वाशीमसह आणखी काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. अमरावतीच्या जागेवर अनपेक्षित उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ-वाशीम व चंद्रपूर हे मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ-वाशीम व अमरावती तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर, रामटेक व भंडारा-गोंदिया अशा सहा जागांबाबत महाविकास आघाडी आशावादी आहे. मात्र, हे सर्व शक्य होईल ते मतविभाजन टाळण्यात यश मिळाले तरच.

Congress & Prakash Ambedkar.
Vanchit Bahujan Aghadi : प्रकाश आंबेडकर म्हणाले, जोपर्यंत जागावाटप होत नाही, तोपर्यंत...

विदर्भात नागपूर, वर्धा आणि बुलढाणा या जागा ‘एनडीए’कडेच राहण्याची शक्यता आहे तर मात्र, उर्वरित सर्वच जागांवर ‘एनडीए’ला जोर लावावा लागणार आहे. ही स्थिती ताज्या सर्वेक्षणातून पुढे येताना दिसते. परंतु लोकसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत अनेक घडामोडी होण्याची शक्यता असून, यंदाची निवडणूक सर्वाधिक चर्चेची राहण्याची शक्यता आहे.

R

Congress & Prakash Ambedkar.
Prakash Ambedkar News: चर्चा फिस्कटल्यास, वंचितचा 'बी-प्लॅन' तयार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com