Congress : 'भाजपने मत चोरी केली, आयोगही सहभागी!', शपधपत्र मागणाऱ्या निवडणूक आयोगाला काँग्रेसने फटकारलं

Congress Politics : मत चोरी प्रकरणावरून सध्या देशात राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी यावरून निवडणूक आयोगाला घेरलं असून आता राज्यातील काँग्रेसने देखील यात उडी घेतली आहे.
Election Commission, Rahul Gandhi
Election Commission, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. राहुल गांधी यांनी भाजपवर मत चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगालाही जबाबदार धरले.

  2. अभिजित सपकाळ यांनी 2019 पूर्वी 44 लाख बोगस मतदारांचे पुरावे दिले होते.

  3. आयोगाने कारवाई न केल्यामुळे काँग्रेसने शपथपत्र मागणीला आक्षेप घेतला आहे.

Nagpur News : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सरळ सरळ भाजपने मत चोरी केल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने यासाठी त्यांना मदत केल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने राहूल गांधी यांना शपथपत्रासह तक्रार करण्यास सांगितले आहे. यावर महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव अभिजित सपकाळ यांनी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्यावतीने सुमारे 44 लाख मतदार बोगस असल्याचे पुरावे मुख्य निवडणूक आयुक्तांना दिले होते. ते मान्यही केले होते. त्यानंतरही मतदार याद्यांमध्ये कुठलीच दुरुस्ती केली नाही. डुप्लिकेट मतदार वगळले नाहीत. त्यामुळे आयोगाला आता शपथपत्र मागण्याचा अधिकार नसल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त मुंबईला आले होते. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी आम्ही महाराष्ट्रातील मतदार यादीत सुमारे 44 लाख डुप्लिकेट मतदार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून मतदार यादी डाऊन लोड करण्यात आली होती.

Election Commission, Rahul Gandhi
Congress Politics : धाक असलेल्या काँग्रेस नेत्याच्या विरोधात बंडाचे निशाण, थेट आक्रोश मोर्चाच काढला!

या यादीमध्ये 14 हजार मतदारांची नावे, आडनाव, वडिलांची किंवा पतीचे नाव, पत्ता एकसारखाच होता. या 14 हजार मतदारांची नावांनी नोंद वेगवेगळ्या मतदारसंघातील 50 पेक्षा अधिक मतदार याद्यांमध्ये होती. त्यावेळी हा आकडा तब्बल साडेसात लाख इतका होता. ही सर्व नावे 44 लाख मतदारांमधून वेगवेगळे फिल्टर लावून काढण्यात आली होती. तेव्हा आयोगाच्या वेबसाइटवर असलेल्या मतदार याद्या डाऊन लोड करता येत होत्या.

पण आता ती सोय नाही. त्यानंतर निवडणूक आयुक्तांनी 15 दिवसांच्या आत याद्या दुरुस्त करण्याचे आश्वासन काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले होते. या याद्या दुरुस्त करणे सोपे आहे. त्यासाठी सॉफ्ट वेअर उपलब्ध आहे. मात्र तेही केली जात नसल्याने निवडणूक आयोगाच्या कारभारभर शंका व्यक्त करण्यास वाव आहे.

2019 ची लोकसभेची निवडणूक चार टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती. बोटावरची शाई मिटवणे आणि पुन्हा मतदान करणे फार अवघड नाही असे सांगून सपकाळ यांनी बोगस मतदार झाले असावे अशीही शंका व्यक्त केली. राहूल गांधी यांनी केलेले आरोप खोटे नाहीत. त्यांना आयोग म्हणते तोंडी आरोप करू नका. शपथपत्राची मागणी राहूल गांधी यांच्याकडे केली जाते.

एकदा पुरावे दिले तेव्हा आयोगाने काहीच केले नाही. आता त्यांना शपथपत्र कशासाठी हवे असा सवाल सपकाळ यांनी केला. तक्रार करताना शपथपत्र देण्याची गरज नसते. जेव्हा पुरावे सादर करायचे असतात तेव्हा शपथपत्र सादर करण्याचा कायदा असल्याचे अभिजित सपकाळ यांनी सांगितले.

Election Commission, Rahul Gandhi
RSS BJP Congress political clash : 'संघाचा विचार फुटीरतावादी'; श्यामाप्रसाद मुखर्जींच्या उपमुख्यमंत्रीपदाचा हर्षवर्धन सपकाळांनी 'इतिहास'च काढला

FAQs :

प्र.१: राहुल गांधी यांनी कोणावर आरोप केला?
उ: त्यांनी भाजपवर मत चोरीचा आणि निवडणूक आयोगावर त्यांना मदत केल्याचा आरोप केला.

प्र.२: बोगस मतदारांचे पुरावे कोणी दिले होते?
उ: काँग्रेसचे प्रदेश महासचिव अभिजित सपकाळ यांनी पुरावे दिले होते.

प्र.३: निवडणूक आयोगाने काय मागणी केली?
उ: त्यांनी राहुल गांधींकडून शपथपत्रासह तक्रार मागितली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com