Sunil Kedar News : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात भाजप पाठोपाठ आता काँग्रेसचे नेतेही आता आंदोलन करायला लागले आहेत. प्रदेश कार्यकारिणीत केदारांच्या सांगण्यावरून अनेकांना डच्चू देण्यात आला आहे. त्यावरून असंतोष खदखदत आहे. नाना पटोले यांच्या कार्यकाळात प्रदेश सचिव असलेले मुजीब पठाण यांना वगळण्यात आले आहे. ही कापाकापी केदारांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे समजताच त्यांनी जिल्हा बँक घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी ठरवलेल्या केदारांवर कारवाई करावी यासाठी आक्रोश मोर्चा काढला.
केदारांचा आक्रमक स्वभाव आणि धाकामुळे सहसा कोणी उघडपणे त्यांच्या विरोधात बोलत नाही. मात्र मुजीब पठाण यांनी थेट आंदोलन करून आपण कोणाच्याही दबावाला पळी पडणार नाही, असे सुतोवाच करून थेट केदारांनाच आव्हान दिले आहे. केदारांच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांच्यापासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आधीच दुरावली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत केदारांनी आक्रमक भूमिका घेतली होती. महाविकास आघाडीने रामटेक विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडला होता. त्याला केदारांनी विरोध केला होता. तत्कालीन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांना उभे करून त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात उघड भूमिका घेतली होती. हिंगणा विधानसभा मतदरसंघातही त्यांनी परस्पर उमेदवार जाहीर केला होता. मात्र राष्ट्रवादी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. रमेश बंग यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांनी अर्ज भरल्यानंतर माघार घ्यावी यासाठी त्यांनी दाबवा टाकला होता. या दोन्ही मतदारसंघात आघाडीचे उमेदवार पराभूत झाले.
केदारांच्या पत्नी सावनेर विधानसभा मतदारसंघातून उभ्या होत्या. केदारांना आपला हक्काचा मतदारसंघही राखता आला नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीतही केदारांनी जिल्हा काँग्रेस कमेटीतून त्यांच्याच पसंतीचे एकच नावाचा ठराव करून पाठवला होता. केदारांच्या धाकामुळे त्यावेळी कोणी विरोध केला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत एकही नेता रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रचाराला आला नव्हता. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना त्यांची भूमिका रामटेक वगळून बोला अशीच होती.
विधानसभेत पराभवाचा मोठा धक्का बसल्यानंतरही केदारांनी आपला काँग्रेसवरचा आपला दबदबा कायम ठेवला आहे. प्रदेश कार्यकारिणीत पक्षाने निलंबित केलेल्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. त्यांना मोठमोठी पदे दिली आहेत. मात्र नाना पटोले यांच्या कार्यकारिणीत सचिव असलेल्या मुजीब पठाण यांना वगळण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर पठाण यांच्या गावात घेण्यात आलेल्या काँग्रेसच्या कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नावाचाही समावेश करण्यात आला नाही. येथून त्यांच्या ऐवजी डॉ. रमण चौधरी यांचा प्रदेश कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
पठाण यांनी थेट केदारांच्या विरोधात आंदोलन करून आपण झुकणार नाही, कोणाच्याही दबावाला बळी पठणार नाही अशी भूमिका घेऊन त्यांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे विधानसभेच्या कार्यकाळात प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून बाबा आष्टनकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते सात महिने या पदावर होते. त्यांना नियमित अध्यक्ष केले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यांच्याही नावाला केदारांचा आधीपासूनच विरोध होता. प्रदेश कार्यकारिणीतून बाबा आष्टनकर यांचाही पत्ता कापण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.