Nana Patole: ही शिंदे-फडणवीसांची मैना, केली महाराष्ट्राची दैना! निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसकडून महायुतीवर हल्लाबोल

Nana Patole attacked on dcm Devendra Fadnavis cm Eknath Shinde: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सध्या पोस्टर वॉर सुरू आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रफुल गुडधे यांचेही फलकही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर शहरात मोठमोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्‍घाटने करीत असताना त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने महायुतीच्या काळात राज्यातील किती व कोणते उद्योग गुजरातला पळवले याची माहिती देणारे रथ तयार करण्यात येत आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या घरासमोर एक रथ उभा करण्यात आला आहे. ‘ही शिंदे फडणवीसाची मैना, केली महाराष्ट्राची दैना', ‘भ्रष्टयुती टेम्पो सर्विस, उद्योग गुजरातला घेऊन जाणार' हे रथावरील फलक सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

फडणवीस यांच्या हस्ते दोन दिवसांपूर्वी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात दोन नव्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध होणार आहे याचीही माहिती देण्यात आली. त्यानंतर नागपूरच्या आंतराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

भाजपच्यावतीने शहरात किती प्रकल्प आणले, उद्योग आले, किती कोटींची विकास कामे केली याच्या धडाक्यात जाहिराती केल्या जात आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यात मोठमोठे फलक लावण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सध्या पोस्टर वॉर सुरू आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार प्रफुल गुडधे यांचेही फलकही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Maharashtra Politics
CM Eknath Shinde: लाडक्या बहिणींनी सुरक्षा कवच तोडलं; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलिसांची धावपळ! नेमकं काय झालं?

छत्रपतींचा पुतळा कोसळला या पार्श्वभूमीवर ‘महाराज आम्हाला माफ करा‘ आणि ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे गुडधे यांचे फलक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फलकाच्या माध्यमातून गुडधे कोणावरही थेट टीका न करता काँग्रेसचा संदेश घरोघरी पोहचवत आहे. आता यात नव्या रथांची भर पडली आहे.

महाराष्ट्रातील उद्योग कसे गुजरातला पळवले याची माहिती दिली जात आहे. महायुती सरकारने राज्यातील उद्योग गुजरातला पळवण्यासाठी टेम्पो सर्विस सुरू केली असल्याचे या माध्यमातून मतदारांना सांगण्यात येत आहे. हे बघता विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सर्वाधिक फोकस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राहणार असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com