Nana Patole News : महाविकास आघाडीचे दसऱ्याला 'सीमोल्लंघन'? महायुतीचा पराभव करणे हेच उद्दिष्ट

Political News : सत्ताधारी व विरोधक एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सॊडत नाहीत. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या जागवाटपाबाबत मोठं विधान केले आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीकडून एकमेकांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांना टार्गेट करण्याची एकही संधी सॊडत नाहीत. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या जागवाटपाबाबत मोठं विधान केले आहे.

महाविकास आघाडीत (MVA) सर्वकाही सिस्टमेटिक सुरू आहे. प्रत्येक जागेवर चर्चा सुरू आहे. निवडून येण्याच्या मेरिटवरच जागा द्यायचा निर्णय झाला आहे. महायुतीचा पराभव करणे हेच आमचे उद्धिष्ट असल्याने ज्याचे मेरिट असेल ती त्या पक्षाने लढावी, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कुठलाच वाद नाही. जागा वाढवून घेण्यासाठी रस्सीखेच नाही. कोणी आग्रहीसुद्धा नाही, असा दावाही पटोले यांनी केला. एखाद्या जागेवर सर्वच पक्ष दावा करीत आहे. हे चालणारच आहे. सर्वच पक्षाला ही अडचण जाणवत आहे. प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. त्यामुळे उशीर लागला तरी चालेल. येत्या दोन दिवसात जागावाटप योग्य पद्धतीने केले जाईल. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व एकत्र येत आहोत. त्यानंतर लगेच जागावाटप जाहीर करण्यात येणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

महायुती सरकारने मूठभर उद्योगपतींसाठी तिजोरी उघडी करून ठेवली आहे. ते तिजोरी लुटून नेत आहेत. त्यामुळे निराधार योजनांना आणि गरीब लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचासुद्धा लाडकी बहीण योजनेलासुद्धा विरोध आहे. काँग्रेसच्या राज्यामध्ये ज्या योजना जाहीर केल्या त्या सुरळीत सुरू आहे. आम्ही उद्योगपतींना पैसे वाटत नाही हे त्यामागचे कारण आहे.

Nana Patole
Nagpur News : नागपूरमधील 'या' नगरसेवकांना लागले आमदारकीचे वेध

देशात सरकार हिंदूंचे आहे. हिंदूंना शिव्या देणाऱ्या मनोहर भिडेवर ते काय कारवाई करतात हे आम्ही पाहतो आहे. हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला दिलेला नाही. विश्व हिंदू परिषदेने गरब्यात येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासा, डोक्यावर टीळा लावा आणि मुस्लिमांना प्रवेश देऊ नका यावर पटोले यांनी ज्यांना भारताचे संविधानच मान्य नाही त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येत नाही असे सांगितले. विविध जाती, धर्म, पंथ, भाष हे भारताचे वैशिष्ट्य आहे. येथे सर्व जण एकोप्याने नांदतात असे सांगून अशा सूचना देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

Nana Patole
Sharad Pawar : शरद पवार खरेच बोलले..! 'ही' पिढी, अन् तीही पिढी, फरक स्पष्ट आहे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com