Mahakumbh Mela terror plot : महाकुंभमेळ्यात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या प्रयत्नात होता बब्बर खालसाचा दहशतवादी, मात्र...

Babbar Khalsa terrorist : उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी पत्रकारपरिषदेत दिली मोठी माहिती ; जाणून घ्या, आणखी काय म्हणाले आहेत?
DGP Prashant kumar
DGP Prashant kumarSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela security :उत्तर प्रदेश पोलिसांची STF आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त अभियान चालवून कौशांबी जिल्ह्याती बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या कथित सक्रीय दहशतवाद्यास अटक केली आहे. दहशतवाद्याची ओळख पंजाबच्या अमृतसरमधील रामदास क्षेत्राच्या कुर्लियान गावचा रहिवसी लजर मसीह अशी झाली आहे.

आता दहशतवाद्याच्या अटेकबद्दल उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी पत्रकारपरिषद घेतली आहे. त्यांनी म्हटले की, दहशतवादी लंजर हा नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या प्रयत्नात होता.

तसेच डीजीपी प्रशांत कुमार यांनी दहशतवादी लजरबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी सांगितले की, तो पाकिस्तानच्या आयएसआयच्या(ISI) संपर्कात होता. पाकिस्तानील काही हॅण्डलर त्याला ड्रोनद्वारे सलग स्फोटकं आणि अन्य सामग्री पाठवत होते.

DGP Prashant kumar
Tahawwur Rana extradition : मुंबई हल्ल्याचा 'मास्टरमाइंड' तहव्वुर राणाला भारतात प्रत्यार्पणाची भरली धडकी, म्हणाला 'जर मी तिथे गेलो, तर...'

याशिवाय डीजीपी प्रशांत कुमार यांनी पत्रकारपरिषदेत ही देखील माहिती दिली की, दहशतवादी लजर हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात पार पडलेल्या महाकुंभमध्ये(Mahakumbh) मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणू इच्छित होता. तसेच तो त्यानंतर पुर्तगालला पळून जाण्याच्याही तयारीत होता. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो काहीच करू शकला नाही. महाकुंभ काळात दहशतवादी लजर हा कौशाम्बी, लखनऊ आणि कानपूर येथे राहत होता.

DGP Prashant kumar
Tejasvi Surya wedding : भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचा पारंपारिक पद्धतीने पार पडला विवाह!

याचबरोबर डीजीपी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, महाकुंभ सुरू होण्याआधीपासूनच काहीजण गडबड करू इच्छित होते, याची माहिती मिळाली होती. त्याअंतर्गत बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि आयएसआयच्या लजर मसीहाला कौशाम्बी येथून अटक केली गेली. याआधी 23 डिसेंबर 2024 रोजी उत्तर प्रदेशातील पीलभीतमध्ये तीन दहशतवादी मारले गेले होते. त्यांच्याजवळून शस्त्रही जप्त करण्यात आली होती. शिवाय दहशतवादी पन्नूनेही महाकुंभ मेळ्यात दहशतवादी हल्ल्याची धमकी दिलेली होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com