Vijay Wadettiwar : रामगिरी कसला संत? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार संतापले

Vijay Wadettiwar Ramgiri Maharaj BJP : संत हे माणुसकीची शिकवण देतात, तेढ निर्माण करत नाही. असे सांगून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांभाळून बोलावे असाही सल्लाही दिला.
Vijay  Wadettiwar  Ramgiri Maharaj
Vijay Wadettiwar Ramgiri Maharaj sarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात काही ठिकाणी वातावरण संवेदनशील झाले आहे. त्यांच्या विधानाचे नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर आणि अहमदनगरमध्ये पडसाद उमटले आहेत. समाजात तणावाचे वातवरण निर्माण झाले आहेत. रामगिरी महाराज यांच्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

'नाशिकची दंगल सरकार पुरस्कृत आहे. महायुतीच्या विरोधात सर्वे असल्याने अशा पद्धतीने मृताच्या टाळूवरचे लोणी खालले जात आहे. महायुतीचे सरकार जातीवाद आहे. राज्यात अस्थितरता निर्माण केली जात आहे. रामगिरी कसला संत? भाजपचे पोसलेले हे संत आहेत.' असा संताप विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

संत हे माणुसकीची शिकवण देतात, तेढ निर्माण करत नाही. असे सांगून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांभाळून बोलावे असाही सल्ला त्यांना वडेट्टीवार यांनी दिला.

महायुतीला पराभव दिसत असल्याने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकात पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनकूल परिस्थिती नसल्याने हे सर्व सुरू आहे. मात्र निवडणूक केव्हाही घेतल्या तरी काही फरक पडणार नाही. महायुतीला पराभूत करण्याचा लोकांनी निर्णय घेतला आहे असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

Vijay  Wadettiwar  Ramgiri Maharaj
Assembly Election 2024 : आजघडीला निवडणुका झाल्यातर महायुती की 'मविआ', कोण ठरणार वरचढ? मोठा ओपिनियन पोल समोर

विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक जागा

विदर्भात सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत. सुमारे दीडशे मतदारसंघात काँग्रेसला आघाडी आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही विदर्भातील अधिकाधिक जागा मागणार आहोत. विदर्भावर आमचा दावा आहे. तीनही पक्षाच्या संयुक्त बैठकीत यावर तोडगा निघेल आणि काँग्रेसला अधिक जागा मिळेल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्रि‍पदाबाबत सावध पवित्र

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा. मी त्याला जाहीर पाठींबा देतो, असे सांगून काँग्रेस आणि शरद पवार गटाला पेचात टाकले आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री कोण असणार? यावर सावध प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवार म्हणाले, 'घाई काय आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आम्ही तीनही पक्ष मिळवून ठरवू.'

Vijay  Wadettiwar  Ramgiri Maharaj
Video Sanjay Raut : संजय राऊतांची जीभ घसरली, 'श्रीकांत शिंदेच्या बापाने नाक रगडले म्हणून...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com