Video Sanjay Raut : संजय राऊतांची जीभ घसरली, 'श्रीकांत शिंदेच्या बापाने नाक रगडले म्हणून...'

Sanjay Raut shrikant shinde : उद्धव ठाकरे यांनी त्यांना खासदार केलं. त्यांची पात्रता आहे का उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची. त्याच्या तिकीटासाठी त्याचे वडील नाक घासत आले होते, असे टीका संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर केली.
Shrikant Shinde Sanjay Raut
Shrikant Shinde Sanjay RautSarakarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली. श्रीकांत शिंदे यांचा 'माकडाचा मुलगा', असा उल्लेख करत खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्याचे वडील नाक घासत उद्धव ठाकरेंकडे आले होते, अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली.

माकडाच्या हाती मशाल, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना श्रीकांत शिंदे हे दवाखाना चालवू शकत नव्हते म्हणून त्यांचे वडील माझा मुलाला तिकीट द्या म्हणून उद्धव ठाकरेंकडे आले होते, असे दावा राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी त्यांना खासदार केलं. त्यांची पात्रता आहे का उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची. त्याच्या तिकीटासाठी त्याचे वडील नाक घासत आले होते, असा व्यक्ती उद्धव ठाकरेंवर बोलत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर केला.

Shrikant Shinde Sanjay Raut
Uddhav Thackeray CM : मुख्यमंत्रिपदावरून दानवेंचे काँग्रेसला चॅलेंज; ठाकरेंना विरोध असल्याचे जाहीर करण्याचे आव्हान

हरण्याची भीती म्हणून...

नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून खोटं बोलत आहेत. घोषणा देतात 'वन नेशन वन इलेक्शन' देतात पण चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. त्यांना महाराष्ट्रात हरण्याची भीती वाटते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर मोदींना सांगावे घ्या निवडणूक.

आम्ही तीन हजार देऊ

महाविकास आघाडीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद करतील, अशी टीका केली जात आहे. मात्र, कोणतेही सरकार अशा योजना बंद करत नाही. त्यांना टीका करायला काय जातय. काँग्रेसच्या योजना मोदींनी नाव बदलून सुरुच ठेवल्या. ते 1500 रुपये देतात आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही 3 हजार रुपये देऊ, हा आमचा शब्द आहे, असे संजय राऊत म्हणाले.

लाडकी बहीण 'यू टर्न' ठरेल

लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी टर्निंग पाॅइंट ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात असताना टर्निंग पाॅइंट नाही तर ही योजना महायुतीसाठी 'यू टर्न' ठरेल, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना आपला गाशा गुंडळावा लागेल महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवणार नाही, असा दावा राऊत यांनी केला आहे.

Shrikant Shinde Sanjay Raut
Kolhapur Vidhan Sabha : मंडलिकांचं मुश्रीफ का घाटगे ठरलं! कागलमध्ये शिवसेना शिंदे गट भाजपच्या विरोधात?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com